शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील जुगार अड्डयावरील धाडीत मालकासह २७ जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2020 23:55 IST

ओवळा येथील भैय्यापाडा तलावाच्या बाजूला असलेल्या एका जुगाराच्या अड्डयावर कासारवडवली पोलिसांनी गुरुवारी रात्री धाड टाकली. या धाडीत ९० हजार ७८० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली असून जुगार अड्डयाच्या मालकासह २७ जणांना पोलिसांनी अटक केली.

ठळक मुद्देकासारवडवली पोलिसांची कारवाईआरोपींची जामीनावर सुटका

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : घोडबंदर रोड भागात भैय्यापाडा तलावाच्या बाजूला असलेल्या महादेव पाटील यांच्या खोलीत चालणाऱ्या जुगार अड्डयावर कासारवडवली पोलिसांनी गुरुवारी रात्री धाड टाकली. या धाडीत ९० हजार ७८० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. याठिकाणी जुगार अड्डयाच्या मालकासह २७ जणांना पोलिसांनी अटक केली. या सर्वांची जामीनावर सुटका झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.घोडबंदर रोडवरील ओवळा येथील महादेव पाटील यांच्या खोलीतील पहिल्या मजल्यावर तीन पत्ता जुगार खेळला जात असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त अनिल कुंभारे यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे वर्तकनगर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त पंकज शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार, निरीक्षक वैभव धुमाळ आणि सहायक पोलीस निरीक्षक एस. एच. चाबुकस्वार आदींच्या पथकाने २२ आॅक्टोबर रोजी रात्री ७ ते ११ वाजण्याच्या सुमारास याठिकाणी धाड टाकली. त्यावेळी जुगाराचा मालक बबन सोमुखराव (४१, रा. कासारवडवली, ठाणे) रमाकांत केणी (६२, रा. ओवळा, ठाणे) आणि व्यवस्थापक शंभू साजेकर (४४, रा. सिद्धेश्वर तलाव, ठाणे) यांच्यासह २७ जणांना बेकायदेशीररित्या ‘तीन पत्ता’ नावाचा जुगार पैशांवर खेळत असतांना त्यांना ताब्यात घेण्यात आले. कोरोनासारख्या साथीच्या आजाराच्या काळात संसर्गाची भीती असतांना हयगयीचे कृत्य, जुगार प्रतिबंधक कायदा तसेच पोलीस आयुक्तांचा मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध कासारवडवली पोलीस ठाण्यात शुक्रवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांची जामीनावर सुटका झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीraidधाड