शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दाऊदसह फरार २७ आरोपी आता आले आहेत भारताच्या टप्प्यात, ९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट खटल्याचा इतिहास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 03:32 IST

ठाणे : मार्च १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटांचा खटला योग्य दिशेने झाला. नुकतीच या खटल्यातील सात आरोपींना शिक्षा झाली.

ठाणे : मार्च १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटांचा खटला योग्य दिशेने झाला. नुकतीच या खटल्यातील सात आरोपींना शिक्षा झाली. खटल्यातील दाऊदसह फरार असलेल्या उर्वरित २७ आरोपींना आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून हे सर्व आरोपी भारताच्या टप्प्यात आहेत. ते पकडले गेले तर खटल्याचा वकील म्हणून त्यांना फाशीची शिक्षा व्हावी, यासाठीच प्रयत्न करणार असल्याचे मत मार्च ९३ च्या बॉम्बस्फोटांच्या खटल्याचे सीबीआयचे विशेष वकील दीपक साळवी यांनी व्यक्त केले.विचार व्यासपीठातर्फे दीपक साळवी यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम मराठी ग्रंथसंग्रहालय येथे नुकातच आयोजिण्यात आला होता. मकरंद मुळे आणि अभय मराठे यांनी मुलाखत घेऊन त्यांना बोलते केले. मुंबई पोलीस, सीबीआय आणि सीआयडी या तपास यंत्रणांनी मार्च ९३ च्या बॉम्बस्फोटांचा खटला हा देशाचा खटला म्हणून पाहिला आणि त्यादृष्टीने मन-बुद्धी स्थिर ठेवून उपलब्ध माहितीचा, स्रोतांचा प्रभावी वापर करून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. बॉम्बस्फोट मालिकेची गुंतागुंत उलगडून सांगितली. सात वर्षांपूर्वी जेव्हा हा खटला हातात घेतला, तेव्हा आरोपींना फासावर लटकवण्याइतके पुरावे नसल्याचे आढळून आल्यानंतर आपल्यामध्ये खूप निराशेचे वातावरण होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयात जवळपास ६८६ साक्षीदारांची साक्ष पुन्हा घेण्याची परवानगी आपण मिळवली. त्यातील ४५० साक्षीदारांची साक्ष नव्याने नोंदवून घेत हा खटला कायद्याच्या दृष्टीने सक्षम केल्यामुळे आरोपींना शिक्षा होण्यास मदत झाली. खटल्याची जवळपास दीड लाख पाने वाचल्यानंतर यातून आरोपी सुटतील, असे वाटले होते. मात्र, नंतर खूप युक्तिवाद आणि संघर्ष केला, असे साळवी यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. माझे वडील, काका, गुरू नानासाहेब लिमये व निवृत्त न्यायमूर्ती देशमुख यांच्या मार्गदर्शन आणि प्रेरणेमुळे मी व्यावसायिक नैतिकता टिकवू शकलो. अन्यथा, या खटल्यादरम्यान अनेक वेळा मला प्रलोभने दाखवली गेली; परंतु ती प्रलोभने मी सहजपणे नाकारली, असेही साळवी यांनी सांगितले.कार्यक्रमादरम्यान साळवी यांचा सत्कार निवृत्त न्यायाधीश सदाशिव देशमुख आणि उद्योजक रमेश म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आला.९३ च्या एका वर्तमानपत्रातील बातमी वाचून एक साक्षीदार नव्याने उभा राहिला होता.त्या साक्षीदारामुळे एका आरोपीला फाशीची शिक्षा मिळाली.या साक्षीदाराने स्वत:ला संरक्षण घेण्यासही नकार दिला आणि प्रसंगी आपल्याला ठार मारले तरी मी साक्ष देईन, असे सांगितले होते, या आठवणीला साळवी यांनी उजाळा दिला.

टॅग्स :thaneठाणेDawood Ibrahimदाऊद इब्राहिम