उल्हासनगरमध्ये डेंग्यूचे २६ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 03:12 AM2018-09-22T03:12:59+5:302018-09-22T03:13:01+5:30

शहर तापाने फणफणले असून डेंग्यूच्या २६ संशयित रुग्णांची नोंद आरोग्य विभागात झाली.

26 patients of dengue in Ulhasnagar | उल्हासनगरमध्ये डेंग्यूचे २६ रुग्ण

उल्हासनगरमध्ये डेंग्यूचे २६ रुग्ण

Next

उल्हासनगर : शहर तापाने फणफणले असून डेंग्यूच्या २६ संशयित रुग्णांची नोंद आरोग्य विभागात झाली. २६ पैकी दोघे पॉझिटिव्ह असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. राजा रिजवानी यांनी दिली.
तापाच्या रुग्णांची संख्या दोन महिन्यांत हजारापेक्षा जास्त झाली असून परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याचे त्यांनी सांगितले. पाण्याचे नमुने, फवारणी आदींवर जोर देत नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे.
कॅम्प नं.-४ परिसरात राहणारे प्रसिद्ध वास्तुविशारद अतुल देशमुख यांचा मुलगा अनिरुद्ध याला चार दिवसांपासून ताप येत होता. रुग्णालयात दाखल केले असता त्याला डेंग्यूची लागण झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याची माहिती नगरसेवक रमेश चव्हाण यांनी रिजवानी यांना दिल्यावर त्यांनी अनिरुद्धची भेट घेतली. तसेच ते शुक्रवारी सोसायटीमधील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेऊन गेले.

Web Title: 26 patients of dengue in Ulhasnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.