शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे शहर आयुक्तालयात बंदप्रकरणी २६ गुन्हे दाखल, ५५ आंदोलकांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 21:12 IST

वाहनांची जाळपोळ, दगडफेक करणा-या ५५ आंदोलकांविरुद्ध एकूण २६ गुन्हे दाखल केल्याची माहिती सह पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय यांनी दिली. गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही ते म्हणाले.

ठळक मुद्देसोशल मिडियाचा गैरवापर, दोषींवर कारवाई करणारचार अधिका-यांसह १४ पोलीस जखमीकल्याण परिमंडामध्ये सर्वाधिक १४ गुन्हे दाखल

ठाणे : कोरेगाव भिमा घटनेच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी बंदच्या दरम्यान ठाणे शहर आयुक्तालय कार्यक्षेत्रामध्ये एकूण २६ गुन्हे दाखल झाले असून जवळपास ५० ते ६० आंदोलकांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. बंदच्या दरम्यान खोट्या पोस्ट टाकून अफवा पसरविण्याचा प्रयत्न समाज माध्यमातून झाला. या काळात चार अधिक-यांसह १४ पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.बुधवारच्या राज्यव्यापी बंद ला ठाणे जिल्हयातही प्रतिसाद मिळाला. काही तुरळक घटना वगळता बंद शांततेत पार पडला. जाळपोळ करणे, वाहनांची तोडफोड करणे, धक्काबुक्की करणे, दगडफेक करणे आदी कलमांखाली आयुक्तालयातील वेगवेगळया पोलीस ठाण्यांमध्ये एकूण २६ गुन्हे दाखल केल्याची माहिती सह पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय यांनी दिली. आतापर्यंत ५५ कार्यकर्त्यांना अटक झाली असून सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही ते म्हणाले. आंदोलकांच्या दगडफेकीत चार अधिकारी तसेच दहा कर्मचारी असे १४ पोलीस कर्मचारी जखमी झाले असून, या आंदोलनाचा संपूर्ण तपशील गोळा करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सर्वाधिक १४ गुन्हे कल्याण परिमंडळातील कार्यक्षेत्रात दाखल झाले असून त्यापाठोपाठ वागळे इस्टेट ५, भिवंडी ४ आणि उल्हासनगर तसेच ठाणे परिमंडळात प्रत्येकी एक असे गुन्हे दाखल झाले आहेत.‘बंद’च्या काळात आंदोलनासंदर्भातील अफवा पसरविणाºया वेगवेगळ्या पोस्ट समाज माध्यमांवर दिवसभर टाकण्यात येत होत्या. वाहतूक सुरळीत असताना जुने फोटो टाकून लोकांची दिशाभूल करण्याचेही प्रकार घडले. त्याचप्रमाणे हिंसाचाराचे जुने फोटो टाकून लोकांना भडकवण्याचा प्रयत्नही काही समाजकंटकांनी केला. याप्रकरणी चौकशी करण्याच्या सुचना गुन्हे अन्वेषण विभागाच्या सायबर सेलच्या युनिटला देण्यात आल्या आहेत. आवश्यकतेनुसार योग्य ती कारवाईदेखील केली जाईल, असेही पाण्डेय यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :thaneठाणेPolice Stationपोलीस ठाणेCrimeगुन्हा