शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

वरिष्ठ पोलिस निरीक्षकाविरुद्ध याचिका करणाऱ्याला २५ हजारांचा दंड

By धीरज परब | Updated: July 13, 2023 20:11 IST

न्यायालयाने याचिका दाखल करून घेत चौकशीचे आदेश दिले. 

मीरारोड -  मीरारोडच्या नया नगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांच्या विरुद्ध  याचिका करणाऱ्या याचिकाकर्त्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने २५ हजारांचा दंड लावत याचिका फेटाळून लावली. न्यायालयास खोटी माहिती देऊन दिशाभूल केली म्हणून न्यायालयाने कारवाईचा बडगा उगारला.

मीरारोडच्या प्रियल इमारतीतील सदनिकेत याचिकाकर्ता खुर्शीद अन्सारी (३८) राहत होता. खुर्शीद हा सदनिकेचा बेकायदेशीर कब्जा  करून राहतोय समजल्यावर  सदनिकेचे मूळ मालक व गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी नया नगर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. ११ जून रोजी सोसायटी सदस्य व खुर्शीद यांच्यात वाद झाल्याने खुर्शीद यांनी पोलिस नियंत्रण कक्षला कॉल करून पोलिस ठाण्यात तक्रारी साठी गेले.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी खुर्शीदला सदनिकेच्या मालकी हक्क ची कागदपत्रे सादर करा अन्यथा बेकायदा सदनिकेत राहतो म्हणून गुन्हा दाखल करावा लागेल असे सांगितले.  सोसायटीचे सदस्य आणि खुर्शीद यांनी आपापसात वाद मिटवू सांगून नंतर त्यांनी सदनिका रिकामी केली.

नंतर मात्र खुर्शीद याने,  वनकोटी यांनी पोलीस ठाण्यात डांबले, खंडणी मागीतली आणि धमकावून सदनिका खाली करण्याचा दबाव टाकल्याचा आरोप करत मुंबई उच्च न्यायालयात फौजदारी याचिका दाखल केली.

न्यायालयाने याचिका दाखल करून घेत चौकशीचे आदेश दिले.  वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी चौकशी करून न्यायालया समोर अहवाल सादर केला. मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती गौरी गोडसे आणि रेवती मोहीते-ढेरे यांच्या खंडपीठाने याचिकाकर्ते खुर्शींद अन्सारीची याचिका फेटाळून लावत त्याला २५ हजारांचा दंड ठोठावला.  

टॅग्स :mira roadमीरा रोडPoliceपोलिसCourtन्यायालय