शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यात कोरोनाकाळात जनतेची २५० कोटींची लूट; रुग्णालये, मेडिकल दुकानांनी कापला खिसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2020 23:50 IST

Thane : कोरोनाच्या गेल्या नऊ महिन्यांच्या काळात रुग्णालये, मेडिकल एजन्सीज मालामाल झाल्या. मात्र, रुग्णांचे आजारपणाने हाल झाले आणि एक ग्राहक या नात्याने सरत्या वर्षात त्यांचे अतोनात आर्थिक नुकसान झाले.

-  स्नेहा पावसकर

ठाणे : कोरोनासारख्या जीवघेण्या आजारातून आपला आणि आपल्या कुटुंबीयांचा जीव वाचवणे महत्त्वाचे असल्याने श्रीमंत असो वा गरीब, कुणीही पैशांचा विचार न करता इस्पितळाची महागडी बिले भरली, दामदुप्पट किमतीची औषधे खरेदी केली तसेच रुग्णवाहिकेकरिता भरमसाट पैसे मोजले. ग्राहक या नात्याने त्यांची केवळ ठाणे जिल्ह्यात किमान २५० कोटी रुपयांची लूटमार केली गेली असल्याचे ग्राहक चळवळीतील कार्यकर्ते व तज्ज्ञ यांचे म्हणणे आहे.कोरोनाच्या गेल्या नऊ महिन्यांच्या काळात रुग्णालये, मेडिकल एजन्सीज मालामाल झाल्या. मात्र, रुग्णांचे आजारपणाने हाल झाले आणि एक ग्राहक या नात्याने सरत्या वर्षात त्यांचे अतोनात आर्थिक नुकसान झाले. आपल्याला दरोडेखोरांच्या टोळ्या बनून रुग्णालये, औषधविक्रेते, रुग्णवाहिका चालक लुटत असल्याचे जाणवत असतानाही अनेकांनी मुकाट्याने हे अत्याचार सहन केले. कोरोना उपचारानंतर खासगी रुग्णालयांनी अवाजवी बिले वसूल करीत गोरगरीब रुग्णांचे खिसे कापले. अनेकांनी ती बिले भरली. मात्र, सातत्याने रुग्णालयांचे हेच प्रकार सुरू राहिल्याने अखेर सरकारने या लुटीची दखल घेत पालिकांना रुग्णांच्या बिलांचे परीक्षण करून घेण्यास सांगितले. ठाण्यात लेखापरीक्षकांनी केलेल्या तपासणीत सुमारे पावणेदोन कोटींच्या आक्षेपार्ह बिलांचा झोल समोर आला. आवाज उठवल्यावर काही रुग्णांना त्यांचे पैसे परत मिळाले. मात्र, ज्यांनी तक्रार केली नाही, अशा असंख्य रुग्णांची ग्राहक म्हणून कोरोनाकाळात लूट झाली.  

कोरोनादरम्यान तीन महिने काम बंदच होते. जुलैपासून पुन्हा ग्राहक मंचाचे काम सुरू झाले. मात्र रुग्णालये, औषधांच्या लुटीविरोधात दावे करणारी एखाददुसरी तक्रार वगळता तक्रारी आलेल्या नाहीत.- उमेश चव्हाण,  प्रबंधक, ठाणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच

अनेक रुग्णालयांविरोधात जास्त बिले घेतल्याच्या तक्रारी होत्या. काहींनी तक्रारी केल्याही नाहीत. मात्र, जिल्ह्यात रुग्णांची जव‌ळपास ६० ते ७० कोटींपर्यंत लूट झालेली आहे. याचे रिऑडिट होण्याची गरज आहे.     - गणेश जाेशी, राष्ट्रीय अध्यक्ष, ग्राहक संरक्षण परिषद 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे