शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

एका मुलीसाठी २५ हजारांचा सौदा; ठाण्यात सेक्स रॅकेट चालवणाऱ्या महिलेस अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2024 07:21 IST

विदेशी तरुणीकडून ठाण्यात सेक्स रॅकेट, ३ तरुणींची सुटका; दलाल महिलेस अटक 

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : थायलंडच्या काही तरुणींकडून सेक्स रॅकेट चालविणाऱ्या विदेशी दलाल महिलेस ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने (एएचटीसी) अटक केल्याची माहिती पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी रविवारी दिली. यातील दलाल महिलेला २५ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

वागळे इस्टेट भागातील लुईसवाडीत सर्व्हिस रोडलगतच्या विटस् शरणम हॉटेलमध्ये काही विदेशी तरुणींकडून शरीर विक्रीचा व्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक चेतना चौधरी यांना मिळाली होती. त्याच आधारे अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. पंजाब उगले, उपायुक्त शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एएचटीसी कक्षाच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक चेतना चौधरी यांच्यासह जमादार श्रद्धा कदम, दीपक वालघुडे, धनंजय मोहिते, देवानंद चव्हाण, कॉन्स्टेबल पूनम खरात आणि किरण चांदेकर आदींच्या पथकाने २१ जून २०२४ रोजी धाड टाकली. एका बोगस गिऱ्हाईकाच्या मदतीने विदेशी तरुणींची मागणी केली. त्यावेळी दलाल विदेशी महिलेने त्याठिकाणी थायलंडच्या तीन मुलींना आणले.

गुन्हा दाखलएका मुलीसाठी २५ हजारांचा सौदाही दलाल महिलेने यावेळी ठरविला. या मुलींच्या सौद्यानंतर गिऱ्हाईकाने इशारा केल्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून थायलंडच्या दलाल महिलेस अटक केली. तिच्या तावडीतून ३० ते ३५ वयोगटातील थायलंडच्या तीन पीडित महिलांची सुटका केली. दलाल आरोपी महिलेविरुद्ध वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पीडित महिला बाल सुधारगृहातपीडित महिलांना मुंबईतील रेस्कू फाउंडेशन या महिला बाल सुधारगृहात ठेवले आहे. या महिला मुंबईतील जुहू भागात वास्तव्याला आहेत. त्यांनी मुंबईत कोणाकडे आश्रय घेतला होता? ठाण्यात त्यांचे आणखी कोणी साथीदार आहेत का? त्यांना या कामासाठी विदेशातून मुंबई, ठाण्यात कोणी आणले? या सर्व बाबींचा तपास करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेSex Racketसेक्स रॅकेट