शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

अपघाताच्या नावाखाली मदत मागून नवी मुंबईच्या रहिवाशाची २५ लाखांनी फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 18:37 IST

कुटुंबातील सदस्यांचा अपघात झाल्याचे भावनिक कारण पुढे करून जोधपुरच्या एका रहिवाशाने नवी मुंबईतील रहिवाशाकडून २५ लाख रुपयांची मदत मागितली. गावाकडचा माणूस म्हणून मदत केल्यानंतर आरोपींनी हात वर केले.

ठळक मुद्देगुन्हा दाखलआरोपी जोधपुरचेशोध सुरू

ठाणे : कुटुंबातील सदस्यांचा अपघात झाल्याचे खोटे कारण सांगून नवी मुंबईच्या रहिवाशाची मदतीच्या नावाखाली २५ लाख रुपयांची फसवणूक करणाºया जोधपुरच्या दोन रहिवाशांविरूद्ध कासारवडवली पोलिसांनी शनिवारी गुन्हा दाखल केला.नवी मुंबईतील ऐरोली येथील रहिवासी किरणसिंह शिवनाथसिंह राजपुरोहीत (४५) हे मुळचे जोधपूर येथील आहेत. आॅगस्ट २0१७ मध्ये त्यांना गावाकडील रेवतसिंह राजपुरोहित यांचा फोन आला. कुटुंबातील तिघांचा गंभीर अपघात झाला असून, एकाचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी असल्याचे त्याने किरणसिंह राजपुरोहीत यांना सांगितले. उपचारासाठी २५ लाख रुपयांची तातडीने मदत करण्याची विनंती त्याने केली. गावातील व्यक्ति म्हणून किरणसिंह राजपुरोहीत यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. ठरल्याप्रमाणे रेवतसिंह राजपुरोहितने पैसे घेण्यासाठी चंद्रविरसिंह चौधरी याला पाठवले. २0 आॅगस्ट रोजी किरणसिंह राजपुरोहीत यांनी चंद्रविरसिंह चौधरी याला भार्इंदरपाड्यातील मेट्रो सुपर मार्केटजवळ बोलावून १0 लाख रुपये रोख दिले. याशिवाय १ सप्टेंबर २0१७ रोजीचा १५ लाख रुपयांचा धनादेश दिला. काही महिने निघून गेल्यानंतर किरणसिंह राजपुरोहीत यांना अशा प्रकारचा कोणता अपघातच झाला नसल्याचे समजले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर राजपुरोहीत यांनी पैशासाठी तगादा लावला. रेवतसिंह राजपुरोहित याने पैशासाठी टाळाटाळ करण्यास सुरूवात केली. किरणसिंह राजपुरोहित यांनी शनिवारी याप्रकरणी कासारवडवली पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार रेवतसिंह राजपुत आणि चंद्रविरसिंह चौधरी यांच्याविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपींचे मोबाईल फोन सातत्याने बंद येत आहेत. त्यांचा शोध घेणे सुरू असल्याचे तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत काळे यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिस