शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

दोघा सराईत चोरट्यांकडून चोरीचे २४ मोबाईल जप्त 

By धीरज परब | Updated: August 29, 2023 19:36 IST

बसमधील प्रवाशांचे तसेच घराचे दार-खिडकी उघडे पाहून मोबाईल चोरणाऱ्या दोघा सराईत चोरांना काशीमीरा पोलिसांनी वेगवेगळ्या गुन्ह्यात अटक करून त्यांच्या कडून चोरीचे २४ मोबाईल हस्तगत केले आहेत.

मीरारोड - बसमधील प्रवाशांचे तसेच घराचे दार-खिडकी उघडे पाहून मोबाईल चोरणाऱ्या दोघा सराईत चोरांना काशीमीरा पोलिसांनी वेगवेगळ्या गुन्ह्यात अटक करून त्यांच्या कडून चोरीचे २४ मोबाईल हस्तगत केले आहेत. माशाचा पाडा येथे राहणारे अनिल प्रजापती यांनी रात्री खिडकी जवळ ठेवलेला मोबाईल चोरीला गेला होता. तर मनोहर काजरेकर हे फाउंटन सिग्नल येथील बस स्टॉप वरुन बसमध्ये बसत असताना त्यांचा खिशातील मोबाईल चोरण्यात आला होता. 

या मोबाईल चोरीच्या गुन्ह्या प्रकरणी  उपायुक्त जयंत बजबळे व सहायक आयुक्त महेश तरडे यांच्या मार्गदर्शनाखाली काशीमीरा पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे निरीक्षक समीर शेख, सहायक निरीक्षक योगेश काळे, उपनिरीक्षक शिवाजी खाडे सह अनिल पवार, दिपक वारे, प्रताप पाचुंदे, अक्षय पाटील, राहुल सोनकांबळे, निलेश शिंदे, स्वप्निल मोहीले, निकम, रवी कांबळे, प्रविण टोबरे, किरण विरकर, राजेंद्र सुर्यवंशी हे तपास करत होते.  प्रजापती यांच्या मोबाईल चोरी प्रकरणी आतिश सिंग रा. दहीसर, मुंबई ह्याला काशीमीराच्या डाचकुलपाडा भागातून पकडले. त्याच्याकडे ४६ हजार ५०० रुपये किमतीचे तब्बल १२ चोरीचे मोबाईल सापडले. तर काजरेकर यांच्या मोबाईल चोरी प्रकरणात जुबेर जाफर कच्ची (२४) रा-राबोडी, ठाणे याला घोडबंदर रोड भागातून ताब्यात घेतले. त्याच्याकडून ५९ हजार किमतीचे १२ मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत.  

टॅग्स :mira roadमीरा रोडtheftचोरीCrime Newsगुन्हेगारी