शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

ठाण्यातील २४ लाख ७२ हजारांची वीज चोरी उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2021 23:48 IST

वीजमीटरमध्ये फेरफार करून रिमोट किट लावून विजेची चोरी करणाऱ्या ठाण्यातील वर्तकनगर येथील एका उद्योजकावर नुकताच गुन्हा दाखल झाला आहे. यात एक लाख ३५ हजार ४६६ युनिटची २४ लाख ७२ हजार १६० रुपयांची वीज चोरी केल्याचे आढळले आहे.

ठळक मुद्देवर्तकनगर येथील उद्योजकावर गुन्हातब्बल एक लाख ३५ हजार ४६६ युनिट वीजेवर डल्ला

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: वीजमीटरमध्ये फेरफार करून रिमोट किट लावून विजेची चोरी करणाऱ्या ठाण्यातील वर्तकनगर येथील एका उद्योजकावर नुकताच गुन्हा दाखल झाला आहे. यात एक लाख ३५ हजार ४६६ युनिटची २४ लाख ७२ हजार १६० रुपयांची वीज चोरी केल्याचे आढळले आहे. महावितरणच्या भांडूप नागरी परिमंडळाने यासंबंधीची कारवाई केल्याची माहिती वीज वितरण कंपनीने मंगळवारी दिली.ठाणे येथील शिवाईनगर शाखा लोकमान्य नगर उपविभागात इंडियन टेक्निकल वर्क्स ही कंपनी आहे. लोकमान्यनगरचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता नारायण सोनावणे, शिवाईनगरचे सहाय्यक अभियंता धनाजी पुकळे तसेच वरिष्ठ तंत्रज्ञ संदीप मंडावळे आदींच्या पथकाने १० जुलै २०२१ रोजी याच कंपनीमध्ये तपासणी केली. तेंव्हा येथील वीज मीटरमध्ये फेरफार असल्याचा संशय आला. त्यामुळे ग्राहक प्रतिनिधीच्या समवेत १२ जुलै रोजी पंचांसमोर सील उघडून या पथकाने तपासणी केली. तेंव्हा वीजमीटरमध्ये फेरफार करून रिमोट किट लावून वीजेची चोरी केल्याचे समोर आले. या ग्राहकाने तब्बल एक लाख ३५ हजार ४६६ युनिटची २४ लाख ७२ हजार १६० रु पयांची वीज अनधिकृतपणे वापरल्यामुळे वीज अधिनियम २००३ मधील कलम १३५ नुसार १९ जुलै रोजी इंडियन टेक्निकल वर्क्सचा मालक अजमल जमाल सय्यद याच्याविरुद्ध वीज चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भांडूप परिमंडळाचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी ही वीजचोरी पकडल्याबद्दल संबंधित अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. वीज वापरणाºया ग्राहकांचाही अशा वीज चोरीमुळे नुकसान होते. ग्राहकांनी अधिकृतपणे विजेचा वापर करावा, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्य अभियंता गणेशकर ग्राहकांना दिला आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी