शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्ता हस्तांतरणचे २२ हजार प्रकरणे प्रलंबित, काँग्रेसने केला भांडाफोड

By अजित मांडके | Updated: February 1, 2024 15:30 IST

गुरुवारी ठाण्यात घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबतचे पुरावेच सादर केले.

ठाणे : ठाणे महापालिकेचा आणखी एक भोंगळ कारभार समोर आला आहे. महापालिकेच्या ९ प्रभाग समिती अंतर्गत तब्बल २२ हजार मालमत्ता हस्तांतरणचे प्रकरण धूळखात पडले असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यात केवळ सहायक आयुक्तच्या सह्या शिल्लक असल्याची माहिती देखील समोर आली. येत्या २ दिवसात ही प्रकरणे मार्गी लावावी अन्यथा काँग्रेस तर्फे आंदोलन केले जाईल असा इशारा काँग्रेसचे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण दिला आहे.  गुरुवारी ठाण्यात घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबतचे पुरावेच सादर केले. यावेळी त्यांच्या समवेत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन शिंदे आणि राहुल पिंगळे उपस्थित होते. वर्तक नगर प्रभाग समिती अंतर्गत एक शिवसेनेच्या माजी नगरसेवकाने मालमत्ता हस्तांतरणाचे प्रकरण मार्गी लागत नसल्याची तक्रार आमच्याकडे केली होती. त्या अनुषगाने याची माहिती घेतली असता एकट्या वर्तकनगर प्रभाग समितीमध्ये मागील वर्षभरापासून ३३८ प्रकरणे केवळ सहाय्यक आयुक्तच्या एका सही साठी दाबून ठेवण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. 

तर लोकमान्य प्रभाग समितीमध्ये २९० प्रकरणे अद्याप मार्गी लागू शकली नसल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. तर केवळ या दोन प्रभाग समितीत नाही तर सर्व ९ प्रभाग समिती मध्ये २२ हजार प्रकरणे रखडली असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. यात कळवा, मुंब्रा आणि दिव्यात सर्वाधिक प्रकरणे असल्याचेही त्यांनी सांगितले. या समितीमध्ये २ हजार ते २२०० प्रकरणे दाबून ठेवली असल्याचा आरोपही चव्हाण यांनी यावेळी केला. त्यामुळे पुढील २ दिवसात ही प्रकरणे मार्गी लागली नाही तर काँग्रेस आंदोलन करेल असा इशाराही त्यांनी दिला. 

टॅग्स :thaneठाणेcongressकाँग्रेस