शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

सेवारस्त्यांच्या दुरुस्तीवर पुन्हा २२ कोटींची उधळण, यापूर्वीच्या कामांचा सुमार दर्जा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2019 01:53 IST

घोडबंदर भागात मेट्रोच्या कामामुळे वाहतूककोंडी होत असून त्यातच सेवारस्त्यांची अवस्थाही वाईट असल्याने तेथून वाहने नेणे कठीण झाले आहे.

ठाणे - घोडबंदर भागात मेट्रोच्या कामामुळे वाहतूककोंडी होत असून त्यातच सेवारस्त्यांची अवस्थाही वाईट असल्याने तेथून वाहने नेणे कठीण झाले आहे. त्यामुळे आता युनिअ‍ॅबेक्स ते गायमुख या दोन्ही बाजूकडील सेवारस्त्यांची कामे करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. यावर पुन्हा २२ कोटींचा खर्च केला जाणार आहे. एक ते दीड वर्षांत इतक्या मोठ्या प्रमाणावर महापालिका खर्च करणार असल्याने प्रशासनाच्या निर्णयक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून यापूर्वी झालेल्या कामांच्या सुमार दर्जास जबाबदार कोण, त्यांना महासभा पाठीशी घालणार का, याकडेही लक्ष लागले आहे.घोडबंदर भागात सध्या मेट्रोच्या कामामुळे कित्येक महिन्यांपासून वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. मधल्या काळात सेवारस्ते तयार झाल्यानंतर पालिकेने ते पुन्हा खोदल्याने या रस्त्यांची चाळण झाली होती. त्यामुळे या भागातील वाहतूककोंडीत भर पडली. आता पावसाळा संपल्याने मानपाडापासून पुढे पातलीपाडापर्यंत सेवारस्त्यांना पडलेले खड्डे बुजविण्यात आले. परंतु, तेथून जातानाही वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. दरम्यान, आता युनिअ‍ॅबेक्स ते गायमुख या दोन्ही बाजूकडील सेवारस्त्यांची कामे करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यासाठी खर्चाचा अंदाज घेतला जात आहे. तरीही, या रस्त्यांच्या कामांसाठी सुमारे २० ते २२ कोटींचा खर्च अपेक्षित धरला आहे.महासभेच्या निर्णयाकडे लक्षवास्तविक पाहता आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या रस्त्यांची कामे संबंधित विभागाला सांगून आधीच केली होती. त्यासाठी सुरुवातीलादेखील कोट्यवधींचा खर्च केला होता. त्यानंतर अवघ्या एक ते दीड वर्षांत पालिकेनेच ते विविध कारणांसाठी पुन्हा खोदले असून आता त्यांच्यावर कोट्यवधींचा खर्च केला जाणार आहे. यामुळे प्रशासनाच्या निर्णयक्षमतेसह कामांच्या सुमार दर्जावर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून महासभा काय निर्णय घेते, याकडे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका