शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

९२२ अपघातांत २१७ मृत्यू, २०१८ मध्ये ठाण्यात ५५ जण अपघातात ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 06:50 IST

ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत २०१७ या वर्षभरात एकूण ९२२ रस्ते अपघातांची नोंद झाली आहे. यामध्ये झालेल्या प्राणांतिक अपघातात २१७ जणांचा बळी गेला आहे. तर, गंभीर आणि किरकोळ अपघातांची संख्या ७०५ इतकी आहे.

- पंकज रोडेकरठाणे  - ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत २०१७ या वर्षभरात एकूण ९२२ रस्ते अपघातांची नोंद झाली आहे. यामध्ये झालेल्या प्राणांतिक अपघातात २१७ जणांचा बळी गेला आहे. तर, गंभीर आणि किरकोळ अपघातांची संख्या ७०५ इतकी आहे. यात नारपोली या वाहतूक उपशाखेच्या हद्दीत सर्वाधिक ७९ प्राणांतिक अपघात घडले असून त्यामध्ये ३५ जणांचा बळी गेला आहे. उल्हासनगर, विठ्ठलवाडी, बदलापूर पश्चिम आणि वागळे इस्टेट या पोलीस ठाणेअंतर्गत एकही प्राणांतिक अपघात झाला नसल्याने तेथे कोणीही दगावले नसल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाहतूक नियंत्रण शाखेच्या एकूण १८ उपशाखा आहेत. ठाणे शहरासह कल्याण, डोंबिवली, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर ही शहरे पाच परिमंडळांतर्गत वेढलेले असून तेथे या उपशाखेद्वारे वाहतुकीवर नियंत्रण राखण्याचे काम करण्यात येते. मुंबई, नवी मुंबई, ठाणे ग्रामीण, गुजरात आदी भागांत जाणारी जडअवजड वाहने ही ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातूून येजा करतात. त्यातच, दिवसेंदिवस वाहनांच्या संख्येतही वाढ होत असल्याने शहरांमध्ये वाहतूककोंडीही पाचवीला पुजलेली आहे. मागील वर्षभरात आयुक्तालयाच्या हद्दीत एकूण २१७ प्राणांतिक, गंभीर ४५६ आणि २४९ किरकोळ अशा एकूण ९२२ अपघातांची नोंद असल्याची माहिती सूत्रांनी दिली.परिमंडळानुसार विचार केल्यास ठाणे शहर आणि वागळे इस्टेट या दोन परिमंडळांत प्राणांतिक अपघातांत ९१ जणांचा मृत्यू झाला. तर,भिवंडीत ६८, कल्याण-डोंबिवलीत ३४,उल्हासनगर परिमंडळात २३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.जानेवारीत ३३ तर फेब्रुवारीत २२ दगावले२०१८ च्या पहिल्या दोन महिन्यांत ५५ प्राणांतिक, ७० गंभीर तर ४९ किरकोळ अपघात असे एकूण १७४ अपघात झाले आहे. यामध्ये ५५ जणांचा मृत्यू झाला आहे. जानेवारी महिन्यात ३३ तर फेब्रुवारी महिन्यात २२ जण रस्ते अपघातात दगावले आहेत.बळींचा आकडा ३१ वाढला२०१७ मधील पहिल्या दोन महिन्यांत २४ जण अपघातात ठार झाले होते. तर, २०१८ मध्ये रस्ते अपघातात ५५ जणांचा मृत्यू झाल्याने यंदा बळींची संख्या ३१ ने वाढल्याचे आकडेवारीवरून दिसते. तसेच २०१७ मध्ये १९० जखमी झाले होते. तर २०१८ मध्ये १७५ जखमी झाले असून जखमींची संख्या मात्रयंदा १५ने कमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :Accidentअपघात