कल्याण : शक्ती सन्मान महोत्सवानिमित्त भाजप प्रदेश महिला मोर्चातर्फे रक्षाबंधनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना २१ लाख राख्या देण्यात येणार आहेत.भाजपच्या कल्याण जिल्ह्यातील चारही विधानसभा क्षेत्रातील महिलांकडून जास्तीत जास्त राख्यांचे संकलन करण्याचा संकल्प जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी केला आहे. राख्यांचे संकलन करण्यासाठी कार्यकर्ते व पदाधिकारी सर्वस्तरातील व विविध क्षेत्रातील महिलांशी संपकर् साधणार आहेत. महिलांना या उपक्रमाची माहिती देऊन ते त्यांच्याकडून मुख्यमंत्री यांना देण्यासाठी राखी व संदेशपर राखी स्वीकारतील. महिलांना एक मोबाइल नंबरही देण्यात येणार आहे. राखी व पत्र कार्यकर्त्याकडे दिल्यावर महिला या अभियानाशी जोडल्या जातील. राखी संकलनाचे काम १५ आॅगस्टपर्यंत करण्यात येणार आहे.१६ आॅगस्टला षण्मुखानंद सभागृहात मुख्यमंत्र्यांना एकत्रित राख्या देण्यात येणार आहेत. या कार्यक्रमास चारही विधानसभांच्या संयोजिका आणि सहसंयोजिका उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रा. उज्वला दुसाने यांनी दिली.हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी महिला मोर्चा, भाजपचे सर्व लोकप्रतिनिधी, शक्ती केंद्र प्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्ते काम करीत आहेत. ज्यांना राखी प्रत्यक्ष पाठविता येणार नाही त्यांनी वेबसाइटवर व्हर्चुअल राखी व संदेश पाठवावा, असे आवाहानही दुसाने यांनी केले आहे.
रक्षाबंधनानिमित्त मुख्यमंत्र्यांना पाठविणार २१ लाख राख्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2019 01:55 IST