शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याची टाकी फुटून २१ घरांचे नुकसान, आजीबाई गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2022 06:00 IST

यामध्ये सहा घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तानुबाई श्रवण मुठे (७५) या जखमी झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.     

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाणे महापालिकेची ७५ हजार लिटर क्षमतेची पिण्याच्या पाण्याची टाकी फुटल्याची घटना शनिवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास वागळे इस्टेट रोड क्रमांक ३३, रुपादेवी टेकडी येथे घडली. या दुर्घटनेत २१ घरांचे नुकसान झाले. यामध्ये सहा घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तानुबाई श्रवण मुठे (७५) या जखमी झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.     

वागळे इस्टेट, रोड क्रमांक ३३ येथे २००९ मध्ये बांधण्यात आलेली ऑस्ट्रेलियन बनावटीची ठाणे महापालिकेची ७५ हजार लिटर क्षमतेची पिण्याच्या पाण्याची (रिनो टँक) टाकी सकाळी फुटून जवळच असलेल्या झोपडपट्टीतील घरांवर मोठ्या वेगाने कोसळल्याने त्या झोपडपट्टीतील घरांच्या भिंती व छप्पर तुटून मोठ्या प्रमाणात नुकसान  झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाला मिळाली. घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी व कर्मचारी, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान, एनडीआरएफचे अधिकारी व जवान, पोलीस कर्मचारी, कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता (पाणी पुरवठा विभाग, लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती) यांच्यासह स्थानिक माजी नगरसेवकांनी धाव घेतली. या दुर्घटनेत तानुबाई मुठे यांच्या उजव्या पायासह उजव्या हाताला व कंबरेला गंभीर दुखापत झाली. त्यांना  लोकमान्य हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.  

टॅग्स :thaneठाणेWaterपाणी