शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे महापालिका रुग्णालयात महिनाभरात २१ बालके दगावली; धक्कादायक माहिती उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2024 10:22 IST

कमी वजनामुळे मृत्यू झाल्याचा प्रशासनाचा दावा; रुग्णालय कायम चर्चेत

ठाणे - ठाणे पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात मागील वर्षी एकाच दिवशी १८ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता मागील महिनाभरात याच रुग्णालयात नवजात २१ बालके दगावल्याची माहिती समोर आली आहे.  या नवजात बालकांचे वजन कमी असल्यानेच त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाने केला आहे. 

रुग्णालयात गेल्या जून महिन्यात ठाणे व पालघर जिल्ह्यांतील ५१२ महिला प्रसूतीसाठी आल्या होत्या. त्यातील ९० महिलांची नोंदणी ही रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्यांची आहे. तर उर्वरित इतर जिल्ह्यांतील होत्या. त्यातील २९४ या सिझरिन प्रसूती होत्या. त्यातील प्रसूती झालेल्या महिला रुग्णांपैकी आठ नवजात बालकांचा ४८ तासांत मृत्यू झाला होता, तर पूर्ण जून महिन्यात २१ नवजात बालकांचा मृत्यू झाला. जूनमध्ये मृत्यू झालेल्या २१ मुलांचे वजन दीड किलोपेक्षा कमी असल्याची माहिती प्रशासनाने दिली. ठाणे व पालघर जिल्ह्यातील गंभीर परिस्थिती असलेल्या प्रसूतीसाठी महिला दाखल झाल्या होत्या. ९० नवजात शिशुचे वजन एक किलोपेक्षा कमी होते. २१ पैकी १९ ही बाहेरची बालके होती. त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू असताना, त्यांचा मृत्यू झाला असल्याचे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले. 

रुग्णालय प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्हमागील वर्षी ऑगस्ट महिन्यात एकाच दिवशी तब्बल १८ रुग्णांचा मृत्यू झाल्याने हे रुग्णालय अधिकच चर्चेत आले होते. त्यानंतर आता पुन्हा एका महिन्यात तब्बल २१ नवजात बालकांचा मृत्यू झाल्याने रुग्णालय प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे, परंतु या घटनेनंतर कळवा रुग्णालयाचा ताण कमी करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात आले होते.  आजही रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णालयात ५०० खाटा आहेत, तर रोजच्या रोज या रुग्णालयात ४५० हून अधिक रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. लहान मुलांसाठी अतिदक्षता विभागात सध्या एनआयसीयूमध्ये ३० खाटा आहेत, त्यातील २० खाटा रुग्णालयातील प्रसूतीसाठी नोंदणी झालेल्या महिलांसाठी राखीव आहेत.

चौकशी करून अहवाल केला जाणार सादरया प्रकरणाचा अहवाल रुग्णालयाचे डीन डॉ. राकेश बारोट यांच्याकडून मागविण्यात आला आहे. मृत्यू पावलेल्या नवजात बालकांचे वजन हे दीड किलोपेक्षा कमी असल्याचे प्रथम दर्शनी दिसत आहे, परंतु आता याची चौकशी केली जाईल आणि याचा अहवाल हा सभागृहासमोर सादर केला जाईल.- उमेश बिरारी, उपायुक्त, ठामपा

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका