जिल्ह्यात शनिवारी २०४ नवे रुग्ण सापडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:27 AM2021-06-20T04:27:07+5:302021-06-20T04:27:07+5:30

ठाणे : ठाणे जिल्ह्यात शनिवारी २०४ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यात आता ५ लाख २७ हजार ६०४ ...

204 new patients were found in the district on Saturday | जिल्ह्यात शनिवारी २०४ नवे रुग्ण सापडले

जिल्ह्यात शनिवारी २०४ नवे रुग्ण सापडले

Next

ठाणे : ठाणे जिल्ह्यात शनिवारी २०४ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यात आता ५ लाख २७ हजार ६०४ रुग्णांची नोंद झाली. तर दिवसभरात २७ रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यातील मृतांची संख्या १० हजार ४८९ झाली आहे.

ठाणे शहर परिसरात ५८ रुग्ण आढळल्याने येथील रुग्णसंख्या आता १ लाख ३२ हजार २१४ झाली आहे. शहरात एका मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या १ हजार ९६४ झाली आहे. तर कल्याण-डोंबिवलीत ३२ रुग्णांसह तीन मृत्यूंची नोंद आहे. नवी मुंबईत ३१ रुग्णांची वाढ झाली असून तीन जण दगावले आहेत. उल्हासनगरमध्ये पाच रुग्णांसह एका मृत्यूची नोंद आहे. भिवंडीत तीन बाधित असून मृत्यूची नोंद नाही. मीरा-भाईंदरमध्ये ३० रुग्ण आढळले असून एका मृत्यूची नोंद आहे. अंबरनाथमध्ये पाच रुग्ण आढळले असून मृत्यूची नोंद नाही. बदलापूरमध्ये १५ रुग्णांची नोंद असून २० मृत्यूंची नोंद आहे. ठाणे ग्रामीणमध्ये २५ नवे रुग्ण वाढले असून एका मृत्यूची नोंद आहे. आता बाधित रुग्णसंख्या ३८ हजार ६९५ झाली असून आतापर्यंत १ हजार १६५ मृत्यूंची नोंद झाली आहे.

Web Title: 204 new patients were found in the district on Saturday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.