शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

‘स्पीड गन’मुळे २० हजार वाहनांना ब्रेक! वर्षभरात दोन कोटी ७१ हजारांचा दंड वसूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2021 23:53 IST

ठाणे वाहतूक पोलिसांची कारवाई, चारच दिवसांपूर्वी ठाण्यातील उपवन येथेही एका महिला चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे झालेल्या अपघातामध्येही सहप्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.  

जितेंद्र कालेकरठाणे : भरधाव वाहने चालविणाऱ्यांवर वाहतूक नियंत्रण शाखेने बडगा उगारला आहे. ‘स्पीड गन’ असलेल्या इंटरसेप्टर वाहनांद्वारे जानेवारी ते डिसेंबर २०२० या कालावधीत २०,७१ वाहन चालकांकडून दोन कोटी ७१ हजारांचा दंड वसूल केल्याची माहिती वाहतूक शाखेने दिली.रस्ता मोकळा मिळो अथवा न मिळो, अत्याधुनिक मोटारी व दुचाकी वेगात चालवल्या जातात. काही अपवाद वगळता कधी कधी तर नाहक ती जोरदार वेगाने पळविली जातात. त्यामुळे अनेकदा अपघात होतो. यात कधी रस्त्यात आलेल्या दुसऱ्या वाहनाला किंवा एखाद्या पादचाऱ्याला चुकविताना हे अपघात होतात. त्यामुळे ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलेटरवर जोर लावल्यामुळे वाहनाचे नियंत्रण सुटते. त्यातच अनेकदा चालक किंवा सह प्रवाशाला जीव गमवावा लागतो.

चारच दिवसांपूर्वी ठाण्यातील उपवन येथेही एका महिला चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे झालेल्या अपघातामध्येही सहप्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.   ठाण्यात शहर वाहतूक पोलिसांकडून अशा शहरांतर्गत आणि राष्ट्रीय महामार्गावर दोन वेगवेगळ्या इंटरसेप्टर वाहनांद्वारे नजर ठेवली जाते. यात वाहनाचा वेग, वेळ आणि क्रमांकही अचूक टिपला जातो. दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक वेग आढळल्यानंतर थेट ई-चालानद्वारे ही कारवाई केली जाते, अशी माहिती पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली.

धावत्या वाहनांचा मोजला जातो वेग  भरघाव वाहन चालविणाऱ्यांवर इंटरसेप्टर वाहनांमधील स्पीड गनद्वारे लेझरने पॉइंट आऊट केले जाते. त्यातून वाहनाचा वेग, तसेच चालक आणि सहप्रवाशाने सीटबेल्ट लावला की नाही, हेही पडताळले जाते. विहित मर्यादेपेक्षा जास्त वेग असेल तर संबंधितांवर ई-चालानद्वारे ऑनलाइन कारवाई केली जाते, अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली. 

अति वेगामुळे वाहनांवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात होतात. शहरात ताशी ३० ते ४० किमी, राष्ट्रीय महामार्गावर ताशी ७० ते ८० किमीचा वेग अपेक्षित आहे. तो नसल्यास अशा वाहनांवर स्पीड गनद्वारे एक हजार रुपये दंडाची कारवाई केली जाते. - बाळासाहेब पाटील,  पोलीस उपायुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा 

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिस