शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

पीकविम्यापासून २० हजार शेतकरी वंचित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2019 06:29 IST

टीडीसीसी बँकेने गेल्या वर्षी (२०१८-१९) प्रधानमंत्री फसल विमा योजने अंतर्गत ठाणे व पालघर जिल्ह्यातील २४ हजार ७५८ शेतकऱ्यांचा खरीप हंगाम पीकविमा हप्तीची रक्कम भरलेली आहे.

ठाणे : टीडीसीसी बँकेने गेल्या वर्षी (२०१८-१९) प्रधानमंत्री फसल विमा योजने अंतर्गत ठाणे व पालघर जिल्ह्यातील २४ हजार ७५८ शेतकऱ्यांचा खरीप हंगाम पीकविमा हप्तीची रक्कम भरलेली आहे. यातील केवळ पालघर जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली असून उर्वरित शेतकरी लाभापासून वंचित आहेत. एवढेच नव्हे तर ठाणे जिल्ह्यातील एकाही शेतक-यास नुकसानभरपाईची रक्कम अद्यापही मिळालेली नाही. यामुळे ती त्वरीत देऊन त्यासाठी लावलेले निकषही स्पष्ट करावेत, अशी तंबी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी दोन्ही जिल्ह्याच्या विमा कंपन्यांना दिली आहे. यामुळे विमा कंपन्याचे धाबे दणाणले आहेत.बँकेने गेल्या वर्षी ठाणे जिल्ह्यातील १४ हजार ६३६ शेतकºयांच्या १२ हजार ५६१.९० हेक्टरसाठी बँकेने ६८ कोटी ५३ लाख ५५ हजार रूपये पीककर्ज वाटप केले आहे. पण ऑगस्टपासून काही ठिकाणी अत्यल्प तर काही भागात अजिबात पाऊस पडला नाही. भात, नागली पीक काही ठिकाणी उन्हामुळे पूर्ण जळून गेले तर काही ठिकाणी पिकास लोंबीच आली नाही, काही ठिकाणी लहान लोंबी तर काहींमध्ये दाणाच भरलेला नाही. यामुळे ५० टक्क्यांपेक्षा कमी उत्पादन आल्याने शेतक-यांना नुकसानभरपाई मिळणे आवश्यक आहे. परंतु, ठाणे जिल्ह्यातील पीकविमा कंपन्यांनी शेतक-यांना नुकसानभरपाईपासून वंचित ठेवल्याने ती त्वरीत देण्यासाठी पाटील यांनी इफफो टोकीओ जनरल इन्शुरन्स कंपनीला चांगलेच धारेवर धरले आहे. गेल्या खरीप हंगामात ठाणे जिल्ह्यातील कर्जदार तसेच बिगरकर्जदार १४ हजार १८७ शेतक-यांनी त्यांच्या ११ हजार ९७.५७ हेक्टर क्षेत्रावरील पिकाचा विमा प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत काढला आहे. मात्र, शेतकºयांना या विम्याव्दारे अद्यापही भरपाई मिळाली नसल्याचे पाटील यांनी विमा कंपनीच्या निदर्शनास आणून दिले.

टॅग्स :Farmerशेतकरी