शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
2
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
3
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
4
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
5
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
6
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
7
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
8
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
9
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
10
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
11
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
12
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
13
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
14
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
15
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
16
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
17
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
18
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
19
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
20
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट

नवीन वर्षात २० टक्के पाणीकपात

By admin | Updated: December 26, 2016 06:38 IST

जिल्ह्यातील पाच महापालिका आणि दोन नगरपालिकांनी लघुपाटबंधारे विभागाचे आदेश धाब्यावर बसवून नोव्हेंबर महिन्यापासून

सुरेश लोखंडे/ठाणेजिल्ह्यातील पाच महापालिका आणि दोन नगरपालिकांनी लघुपाटबंधारे विभागाचे आदेश धाब्यावर बसवून नोव्हेंबर महिन्यापासून ५ ते १० टक्के अतिरिक्त पाणी उचलत असल्याचे निदर्शनास आले असल्याने नववर्षाची पहाट १० ते २० टक्क्यांची पाणीकपात घेऊनच उजाडणार आहे. सध्या वेगवेगळ्या महापालिकांनी लागू केलेली कपात ही स्वयंघोषित असून आपल्या पाणीचोरीवर पांघरूण घालण्याचा केलेला तोकडा प्रयत्न असल्याचे अधिकाऱ्यांचे मत आहे. महापालिकांसह पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रणांच्या रोजच्या पाणीवापराची नोंद केली जात असून मंजूर कोट्यापेक्षा कुणी किती टक्के जादा पाणी उचलले, त्याचे आॅडिट डिसेंबर महिनाअखेर केले जाणार आहे. सोमवार, २ जानेवारी रोजी बैठक घेऊन लघुपाटबंधारे विभाग संपूर्ण जिल्ह्याकरिता १० ते २० टक्के पाणीकपात जाहीर करणार आहे. यामुळे नूतन वर्षारंभीच गृहिणींना पाणी संकटाला तोंड द्यावे लागणार आहे.बारवी धरणासह उल्हास नदी, बदलापूर बंधारा आणि मोहने बंधारा यातील उपलब्ध पाणीसाठ्यातून ठाणे महापालिकेच्या काही भागांसह कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भार्इंदर या महापालिकांप्रमाणेच अंबरनाथ व कुळगाव-बदलापूर नगरपालिकांना रोज पाणीपुरवठा होत आहे. एमआयडीसी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, टेमघर आणि काही मनपा स्वत:च्या जलस्रोताद्वारे पाणीपुरवठा करत आहेत. मात्र, या पाणीसाठ्यावर पाटबंधारे खात्याचे नियंत्रण आहे. पुढील वर्षीच्या जुलैपर्यंत पाणी पुरवण्याची जबाबदारी त्यांच्यावर असल्यामुळे १५ नोव्हेंबरपासून त्यांनी जादा पाणी उचलण्यावर बंदी घातली होती. तरीही, मंजूर कोट्यापेक्षा सर्वांकडूनच ५ ते १० टक्के जादा पाणी उचलले गेल्याचे निदर्शनास आल्यामुळे जादा पाणी उचलण्यावर निर्बंध लागू केले होते. आता दररोजच्या पाणीपुरवठ्यात १० ते २० टक्के कपात लागू केली जाईल. महापालिका, नगरपालिकांनी अतिरिक्त पाणी उचलल्याची भरपाई करण्याकरिता आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद केला होता. यानंतरही अतिरिक्त पाणी उचलल्यास दंडात्मक कारवाई अथवा पाणीपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्याचे अधिकार पाटबंधारे विभाग वापरू शकेल.