शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात तब्बल 20 किलोमीटरची वाहतूककोंडी; मुंब्रा बायपास कंटेनर उलटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 23:41 IST

घाेडबंदर रोडवर प्रचंड मनस्ताप; मानकोली नाक्यावर थांबवली वाहने

ठाणे : मुंब्रा बायपास रोडवर उलटलेल्या कंटेनरने ठाणे शहरात गुरुवारी सकाळी वाहतुकीचे तीनतेरा वाजले. या अपघातामुळे शहरात वाहतुकीवर परिणाम होऊन मुख्य रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. चाकरमान्यांना या कोंडीमुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागला. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास कंटेनर हटवल्यानंतर वाहतूक पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली. 

मुंब्रा बायपास रोडवरील हॉटेल लाल किल्ल्याजवळ बुधवारी मध्यरात्री २.३० वाजता कंटेनर उलटून रस्त्याच्या मधोमध आडवा झाला. या अपघातात कोणीही जखमी झाले नसले, तरी मुंब्रा बायपास रोडवर मोठी वाहतूककोंडी झाली. ही कोंडी सकाळपर्यंत ठाण्यापर्यंत पोहोचून, शहरातही वाहनांच्या रांगा लागल्या. सकाळी कामानिमित्त बाहेर पडलेले चाकरमानी या कोंडीत अडकून पडले.

तीन हायड्रा क्रेनच्या मदतीने कंटेनर हलवल्याची माहिती ठामपा आपत्ती व्यवस्थापन कक्षप्रमुख संतोष कदम यांनी दिली. या घटनेची माहिती मिळताच ठामपा अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र रात्र असल्याने कंटेनर हलवता आला नाही. सकाळ होताच कंटेनर हलविण्याचे काम हाती घेण्यात आले. याचदरम्यान या अपघातामुळे शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांसह शहरातून बाहेर जाणाऱ्या, तसेच ठाण्याकडून पनवेलकडे जाणारी वाहतूक खोळंबली. परिणामी नाशिकहून मुंबईकडे, तसेच घोडबंदरहून ठाण्याकडे येणाऱ्या वाहिनीवर वाहतूककोंडी झाली. 

अवजड वाहन उलटल्याची २४ तासांत दुसरी घटना 

बुधवारी दुपारी तळोजाहून भिवंडीकडे निघालेला ट्रक मुंब्रा बायपासवरील मुंब्रादेवी रोडच्या कडेला उलटला. यामध्ये कोणीही जखमी झाले नसून हा ट्रक जेवणासाठी लागणाऱ्या तेलाच्या बॅगने भरला होता. बायपास रोडवरील २४ तासांमधील ही दुसरी घटना आहे. दोन्ही घटनांमध्ये कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अपघातग्रस्त कंटेनर हा ठाण्यातून जेएनपीटीकडे जात होता. बायपासवर कंटेनरचा टायर फुटला आणि तो ठाण्याकडून जाणाऱ्या वाहिनीवर मधोमध उलटला. बायपासवरील ठाण्याकडे येणारी वाहिनी सुरळीत सुरू असल्याने त्या वाहिनीवर कोंडी झाली नव्हती. कंटेनर उचलण्यास सुरू केल्यावर दोन्ही बाजूंनी वाहतूक थांबविण्यात आली. कंटनेर उचलून बाजूला करण्यास दहा ते साडेदहा वाजले. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. - बाळासाहेब पाटील, उपायुक्त, वाहतूक शाखा, ठाणे

टॅग्स :thaneठाणेroad transportरस्ते वाहतूक