शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
5
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
6
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
7
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
8
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
9
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
10
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
11
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
12
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
13
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
14
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
16
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
17
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
18
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
19
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्राला पालिकेचे २० कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2018 1:23 AM

मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्रात आणखी इमारत उभारण्यासाठी ठाणे महापालिकेकडून २० कोटी रुपयांचा निधी दिला जाईल, अशी घोषणा महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी गुरुवारी केली.

ठाणे : मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्रात आणखी इमारत उभारण्यासाठी ठाणे महापालिकेकडून २० कोटी रुपयांचा निधी दिला जाईल, अशी घोषणा महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी गुरुवारी केली. उपकेंद्राला निधी देण्याबरोबरच आणखी सुविधाही पुरवण्यात येणार आहेत. या प्रस्तावाला महासभेची मान्यता घेण्यात येणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले.कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार अ‍ॅड. निरंजन डावखरे यांच्या पुढाकारानुसार, मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्रातील अडचणी सोडवण्याबाबत महापालिकेत बैठक घेण्यात आली. या बैठकीला कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर, भाजपाचे नगरसेवक मनोहर डुंबरे, माजी प्र-कुलगुरू डॉ. नरेशचंद्र, डॉ. अजय भामरे, उपकेंद्राचे प्रभारी चंद्रशेखर मराठे आदी उपस्थित होते.ठाणे उपकेंद्रात बीबीए, एलएलबी व बीएमएस, एमबीए अभ्यासक्र म सुरू असून ३५० हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, बीबीए, एलएलबी अभ्यासक्र मासाठी पूर्णवेळ शिक्षक कमी असल्यामुळे विद्यार्थ्यांची अडचण होत होती. या मुद्यांसंदर्भात आमदार डावखरे यांनी उपकेंद्राला १९ आॅक्टोबर रोजी भेट दिली होती. त्यावेळी उपकेंद्रातील गैरसोयी त्यांच्यासमोर आल्या होत्या. त्यांनी याबाबत प्रभारी संचालक डॉ. चंद्रशेखर मराठे यांच्याबरोबर चर्चा केली. त्यावेळी त्यांनी पालिका प्रशासनाकडे काही प्रश्न प्रलंबित असल्याचे स्पष्ट केले होते.उपकेंद्राकडे जाणारा रस्ता, टीएमटी बससेवेची अपुरी संख्या, विद्यापीठाकडे जाण्यासाठी दिशानिर्देश करणारे फलक आदींबाबत चर्चा झाली होती.या प्रश्नांसंदर्भात डावखरे यांनी पालिका आयुक्तांचे लक्ष वेधले होते. त्यानुसार, महापालिकेत ही बैठक घेण्यात आली.यानुसार, उपकेंद्रात आणखी एक इमारत उभारण्यासाठी २० कोटी रु पयांचा निधी दिला जाईल. उपकेंद्राच्या इमारतीची ओसी, टीएमटी बससेवेच्या वाढीव फेऱ्या, उपकेंद्राकडे जाण्यासाठी पक्का रस्ता, दिशादर्शक फलक आदींचे काम सुरू केले जाईल, असेही आयुक्तांनी सांगितले. या प्रस्तावाला महापालिकेच्या महासभेत मान्यता घेतली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिल्याची माहिती डावखरे यांनी दिली.>जादा शिक्षक नियुक्तीचा आग्रहंठाणे येथील उपकेंद्रात शिक्षकांच्या अपुºया संख्येमुळे अडचणी येत असल्याकडे आमदार डावखरे यांनी कुलगुरू पेडणेकर यांचे लक्ष वेधले. तसेच जादा शिक्षकांच्या नियुक्तीची मागणी केली. त्यावेळी याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

टॅग्स :thaneठाणे