शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पालघरमध्ये ६७० जणांना वाचविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2019 03:54 IST

अतिवृष्टीमुळे पूल खचले; एनडीआरएफ, कोस्टगार्ड जवानांची कामगिरी

पालघर : जिल्ह्यात आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांतील पूल खचल्याने आणि पाणी साचून राहिल्याने ठिकठिकाणी अडकलेल्या ६७० लोकांची सुखरूप सुटका एनडीआरएफ आणि कोस्टगार्डच्या जवानांनी केली. जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे स्वत: आपल्या विविध टीमसह घटनास्थळी जाऊन मदतकार्याचा आढावा घेत आहेत.मुसळधार पाऊस, समुद्राला आलेली मोठी भरती, त्यातच विविध धरणांतून पाण्याचा होणारा विसर्ग अशा तिहेरी संकटाचा सामना येथील नागरिकांना करावा लागत आहे. त्यामुळे घराबाहेर पडलेले हजारो नागरिक आपल्या घराकडे जाताना मध्येच अडकून पडल्याच्या घटना घडल्या. वाडा तालुक्यातील केलटन भागात पाणी शिरल्याने ४० जण अडकले. मनोर (टेण)-वाडा रस्त्यावरील करळगाव येथे ४, वसई तालुक्यातील राजोडीमधून ३००, मोरीगावातून १८९, भाताणे १०, नवघर (पूर्व) मिठागर भागातील ४७, अर्नाळामधून ८८ अशा पुराच्या पाण्यात अडकलेल्या एकूण ६७० जणांच्या सुखरूप सुटकेसाठी एनडीआरएफ आणि कोस्टगार्डच्या जवानांनी अथक परिश्रम घेतले. या सर्व घडामोडींकडे जिल्हा प्रशासन लक्ष ठेवून असून आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अध्यक्ष तथा उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन जातीने लक्ष देत आहेत.वैतरणा खाडीच्या मध्ये असणारे वाढीव गाव शनिवारपासून पाण्याखाली असून गुडघाभर पाणी प्रत्येक घरात आहे. दोन दिवस हे गाव अंधारात असून एकाही घरात शनिवारपासून चूल पेटलेली नाही. याच गावातील बेबी बाई भोईर या ६० वर्षीय महिला १ आॅगस्ट रोजी वैतरणा पुलावरून खाडीच्या पाण्यात पडल्या असून आजपर्यंत त्यांचा शोध लागलेला नाही. महावितरण विभागाच्या अधीक्षक अभियंता किरण नगावकर यांच्याशी संपर्कसाधून अंधारात वनचरांचा धोका पाहता वीजपुरवठा करण्याबाबत त्यांना कळविण्यात आले आहे.वसईत ४०० जणांना वाचवलेवसई पूर्वेस असलेली मिठागर वसाहत या परिसरात साधारण ४०० जण अडकले होते. त्या सर्वांना वसई तहसीलदार, महापालिका, अग्निशमन दलाच्या जवानांनी बोटीच्या मदतीने बाहेर काढण्यात आले.वसई पूर्वेस मोरी, सारजा मोरी, कामण आदी गावे आहेत. मात्र येथे दोन नद्यांची पात्रे असून या भागात साधारणपणे २०० जण राहतात. रविवारी या ठिकाणी ७० ते ८० ग्रामस्थ अडकून बसले होते. त्यांच्या मदतीसाठी तहसीलदार व जिल्हा आपत्कालीन यंत्रणेने एनडीआरएफची टीम बोलावली. त्यांना बोटीतून सुरक्षितस्थळी आणले असून बचावकार्य सुरू आहे.जनावरे गेली वाहूनवाडा तालुक्यातील गांध्रे येथे वैतरणा नदीजवळ प्रभाकर भोईर (४० म्हशी), अरुण ठाकरे (१० म्हशी), विवेक ठाकरे (३ जर्शीगाई) यांचे तबेले होते. वैतरणा नदीला आलेल्या महापुरात या तबेल्यांत पाणी जाऊन काही जनावरे वाहून गेली, तर काही पुराच्या पाण्यात अडकली आहेत. पोलीस व स्थानिक ग्रामस्थांनी दोरीच्या मदतीने येथील सहा कामगारांना पुराच्या पाण्यातून सुखरूप काढले आहे.

टॅग्स :Rainपाऊस