शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
2
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
4
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
5
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
6
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
7
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
8
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
9
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
10
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
11
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
12
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
13
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
14
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
15
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
16
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
17
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
18
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
19
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
20
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर

केडीएमटी रोज चालवणार १३७ बस; परिवहनचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 00:18 IST

९१ कोटी ३५ लाखांचा जमेचा अर्थसंकल्प सभापतींना सादर

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेचा परिवहन उपक्रम हा तोट्यात सुरू आहे. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे ताफ्यात बस असूनही सध्या केवळ ७० बसच रस्त्यावर धावत आहेत. त्यामुळे यंदाच्या वर्षात १३७ बस रस्त्यावर आणण्याचे नियोजन परिवहन व्यवस्थापनाने केले असून, यंदाच्या प्रशासकीय अर्थसंकल्पात त्यावर भर दिला आहे.प्रशासनाने तयार केलेला ९१ कोटी ३५ लाख रुपये जमेचा व ८९ कोटी २५ लाख रुपये खर्चाचा अर्थसंकल्प बुधवारी परिवहनचे उपायुक्त मारुती खोडके यांनी परिवहन सभापती मनोज चौधरी यांना सादर केला. परिवहनच्या ताफ्यात १०० बस आहेत. तर, जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान अभियानांतर्गत दाखल झालेल्या ११८ बस, अशा एकूण २१८ बस आहेत. परंतु, कर्मचारीवर्ग पुरेसा नसल्याने सगळ्या बस चालविता येत नाही. त्यामुळे सध्या केवळ ७० बस चालविल्या जातात. तर, ६९ बस या केवळ सात वर्षांत भंगारात गेल्या आहेत. त्या भंगारात काढायच्या की त्यांचा लिलावा करायचा, हा विषयावर निर्णय घेण्यासाठी नेमलेल्या समितीने आपला अहवाल दिला असून, त्यावर प्रशासनाकडून निर्णय घेतला जाणार आहे. असे असले तरी यंदाच्या वर्षांत १३७ बस चालविण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. परिवहनच्या सेवेचा लाभ दिवसाला ३५ ते ४० हजार प्रवासी घेत आहेत. या प्रवासी वाहतुकीतून परिवहनला महिन्याला एक कोटी ४९ लाख रुपये तर, वर्षाला १६ कोटी आठ लाखांचे उत्पन्न मिळते. परंतु, वाहतूककोंडीचा फटका कल्याण-भिवंडी, कल्याण-वाशी, बेलापूर, कल्याण-पनवेल आणि कल्याण-बदलापूर मार्गावरील बसना बसत आहे. त्यामुळे बसच्या फेºया कमी होत असल्याचा मुद्दा प्रशासनाने अधोरेखित केला आहे.परिवहन उपक्रमाचा स्मार्ट सिटीत समावेश केला आहे. व्हेइकल ट्रेकिंग अ‍ॅण्ड पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टीम, यासाठी ३२ कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे. प्रवासी भाडे सुसूत्रीकरणाचा प्रस्ताव ठाणे आरटीओ कार्यालयाकडे सादर करण्यात आला आहे. खंबाळपाडा बस डेपोचे काम पहिल्या टप्प्यात पूर्ण झाले आहे. आता दुसºया टप्प्यात कार्यशाळा उभारणे व मूलभूत सोयीसुविधांच्या कामासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे.त्याचबरोबर गणेशघाट बस डेपोची शेड बांधणे, कर्मचारी दालनाची दुरुस्ती करणे, नाल्यालगतची संरक्षक भिंत बांधणे, वसंत व्हॅली बस डेपोत मूलभूत सोयीसुविधा पुरविणे ही कामे महापालिकेच्या स्तरावर करण्यात येणार आहेत. परिवहनची मदार ही महापालिकेच्या अनुदानावर असल्याने महापालिकेने अनुदान दिल्यास प्रशासनाचे अंदाजपत्रक प्रत्यक्षात येऊ शकते, असा दावा प्रशासनानेकेला आहे.सातवा वेतन देण्यासाठी ३३ कोटी ३८ लाखांचा खर्च प्रस्तावितपरिवहन व्यवस्थापन विभाग, यंत्रशाळा, वाहतूक विभाग कर्मचाºयांना सातवा वेतन आयोगनुसार वेतन अपेक्षित वाढ गृहीत धरण्यात आली आहे. त्यासाठी ३३ कोटी ३८ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.कर्मचाºयांची थकीत देणी व सानुग्रह अनुदानासाठी एक कोटी १० लाख रुपयांची तरतूद केली आहे.वाहनदुरुस्ती व निगा, यासाठी सात कोटी १९ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.इंधनखरेदीसाठी १९ कोटी ४१ लाख रुपयांचा खर्च गृहीत धरला आहे.शासकीय करापोटी दोन कोटी १८ लाख रुपयांचा खर्च होऊ शकतो.सहा कोटी ८३ लाख रुपये भांडवली खर्च अपेक्षित आहे.उत्पन्नाची बाजू अशी असेलबसची संख्या वाढविण्याचे नियोजन असल्याने यंदाच्या वर्षात प्रवासी वाहतुकीतून ३० कोटी चार लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. त्यात केवळ प्रवासी तिकीट विक्रीसह विनातिकीट प्रवासी दंडवसुली, विद्यार्थी व मासिक प्रवासी पास, भाडे यांचा समावेश आहे.इतर मिळकतीपासून पाच कोटी ६८ लाख रुपये उत्पन्न मिळणार असल्याचे अपेक्षित धरण्यात आले आहे.११८ बस व १२४ बसथांबे येथे जाहिरातीच्या माध्यमातून परिवहनला यंदाच्या वर्षात एक कोटी ५४ लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे.पोलीस कर्मचाºयांच्या प्रवासापोटी परिवहनला ९० लाख रुपये मिळणे अपेक्षित आहे.लग्न सभारंभ, खाजगी कार्यक्रमासाठी परिवहनच्या बसभाड्याने देण्यात येतात. यातून सहा लाख रुपये उत्पन्न मिळू शकते.महसुली खर्चासाठी ३० कोटी रुपये, कर्मचारी थकीत देण्यापोटी पाच कोटी रुपये, असे ३५ कोटी रुपयांचे अनुदान महापालिका प्रशासनाकडे प्रशासनाकडून मागण्यात आले आहे.