शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

ठेवीदारांच्या बनावट सह्या करून १९ लाखांचा अपहार, खजिनदाराला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 03:35 IST

मुंबईतील रामचंद्र गुरव या खातेदाराने विश्वासाने ठेवलेल्या १९ लाख ३० हजारांच्या रकमेचा ठाण्याच्या विशालदीप सहकारी पतसंस्थेच्या इंदिरानगर शाखेतील व्यवस्थापक आणि खजिनदाराने अपहार केल्याचा प्रकार समोर आला आहे.

ठाणे  - मुंबईतील रामचंद्र गुरव या खातेदाराने विश्वासाने ठेवलेल्या १९ लाख ३० हजारांच्या रकमेचा ठाण्याच्या विशालदीप सहकारी पतसंस्थेच्या इंदिरानगर शाखेतील व्यवस्थापक आणि खजिनदाराने अपहार केल्याचा प्रकार समोर आला आहे. खातेदाराची बचत खात्यातील रक्कम परस्पर ‘एफडी’मध्ये रूपांतरित करून त्यावर कर्ज घेण्याचा पराक्रम आरोपींनी केला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर खजिनदार दादासाहेब केसरे (२७) याला श्रीनगर पोलिसांनी अटक केली.गुरव यांनी १७ एप्रिल २०१७ रोजी त्यांची दोन्ही मुले, लहान भाऊ आणि त्याची पत्नी यांच्या विशालदीप सहकारी पतसंस्थेच्या इंदिरानगर शाखेतील बचत खात्यात धनादेशाद्वारे १९ लाख ३० हजारांची रक्कम जमा केली होती. ही रक्कम दुसऱ्याच दिवशी, १८ एप्रिल रोजी पतसंस्थेचे शाखा व्यवस्थापक प्रकाश नलावडे आणि खजिनदार दादासाहेब केसरे यांनी आपसात संगनमत करून रामचंद्र गुरव यांच्यासह त्यांची दोन्ही मुले, लहान भाऊ शंकर आणि त्यांची पत्नी यांच्यापैकी कुणाचीही लेखी परवानगी किंवा संमतीपत्र न घेताच त्यांच्या बनावट सह्या करून त्यांच्या बचत खात्यातील रकमेची परस्पर एफडी (मुदत ठेव) केली. त्याच एफडीवर तारण कर्ज घेऊन ती रक्कम पुन्हा त्यांच्या बचत खात्यात जमा केली. आरोपी नलावडे आणि केसरे यांनी गुरव कुटुंबीयांच्या बनावट स्वाक्षºया करून १८ एप्रिल ते १५ सप्टेंबर २०१७ या मुदतीत पैसे काढून त्यांची १९ लाख ३० हजारांची फसवणूक केली. सुरुवातीला गुरव यांनी याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केला होता. त्याच्या चौकशीत या अपहाराचा प्रकार उघड झाल्याने याप्रकरणी अपहार, फसवणुकीचा गुन्हा श्रीनगर पोलीस ठाण्यात ११ आॅगस्ट रोजी दाखल केला. शनिवारी रात्री खजिनदार केसरेला अटक करण्यात आली असून प्रकाशलाही चौकशीनंतर अटक करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.पैसे देण्यास टाळाटाळ केल्याने तक्रारविशालदीप सहकारी पतसंस्थेच्या बचत खात्यात ठेवलेली १९ लाख ३० हजारांची रक्कम काढण्यासाठी रामचंद्र गुरव पतसंस्थेत गेले होते. या पतसंस्थेतून त्यांना पैसे देण्यास टाळाटाळ होऊ लागली. त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत होती. त्यांनी कंटाळून याबाबत पोलिसांकडे तक्रार केली. या तक्रारीच्या चौकशीतून हा अपहार उघड झाला. आरोपी खजिनदाराला अटक झाली असून त्याचा साथीदार शाखा व्यवस्थापक प्रकाश नलावडे यालाही चौकशीनंतर अटक केली जाणार आहे.- सुलभा पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्रीनगर पोलीस ठाणे

टॅग्स :fraudधोकेबाजीCrimeगुन्हा