शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

१,७७७ कुपोषितांना मुसळधार पावसाचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 06:40 IST

ठाणे जिल्ह्यात तीव्र कमी वजनासह मध्यम वजनाची १० हजार ७६४ बालके कुपोषित आहेत. यातील तीव्र कमी वजनाच्या एक हजार ७७७ कुपोषित बालकांच्या जीवितास संभाव्य मुसळधार पावसात धोका संभवण्याची शक्यता आहे.

- सुरेश लोखंडेठाणे -  जिल्ह्यात तीव्र कमी वजनासह मध्यम वजनाची १० हजार ७६४ बालके कुपोषित आहेत. यातील तीव्र कमी वजनाच्या एक हजार ७७७ कुपोषित बालकांच्या जीवितास संभाव्य मुसळधार पावसात धोका संभवण्याची शक्यता आहे. त्यावर मात करण्यासाठी वेळीच पावसाळी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.मध्यम व कमी वजनाच्या १० हजार ७६४ कुपोषित बालकांच्या सुदृढतेसाठी युद्धपातळीवर उपाययोजना हाती घेण्याची गरज आहे. मात्र, जिल्ह्यात सद्य:स्थितीला कुपोषित बालकांसाठी कोणतीही उपाययोजना हाती घेतलेली नसल्याची चिंता सामाजिक संघटनांकडून होत आहे. आरोग्य विभागाकडून औषधोपचार होत असल्याचे आढळून आले. मध्यम व तीव्र कमी वजनाच्या बालकांना संभाव्य मुसळधार पावसाच्या कालावधीत पोषण व पोषक आहाराअभावी धोका होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आदिवासी दुर्गम भागतील सामाजिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.जिल्ह्यातील ग्रामीण, आदिवासी, दुर्गम भागात सहा वर्षे वयोगटांपर्यंतचे एक लाख ३० हजार बालके आहेत. यापैकी एक लाख ११ हजार ८३४ बालकांचे वजन घेऊन त्यातील सुदृढ म्हणजे सर्वसाधारण एक लाख एक हजार ७० बालके आढळून आली. मात्र, मध्यम कमी वजनाची आठ हजार ९८७ बालकांसह तीव्र कमी वजनांची एक हजार ७७७ बालके कुपोषणाची आहेत. यातील या एक हजार ७७७ बालकांच्या जीवितास पोषक आहाराअभावी धोका संभवतो. यंदा सर्वाधिक काळ मुसळधार पावसाचा असल्याची शक्यता आहे. यादरम्यान दुर्गम, आदिवासी भागात रोजगार समस्या तीव्र होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे कुपोषित बालकांकडे आदिवासी मातापित्याचे दुर्लक्ष होऊन ते मृत्यूच्या चक्रव्यूहात सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या कुपोषित बालकांमध्ये एक हजार ७७७ तीव्र बालकांप्रमाणेच १३५ दुर्धर आजारांच्या बालकांना या पावसाळ्यात मरणयातना भोगाव्या लागण्याची दाट शक्यता आहे.जिल्हा प्रशासनासह जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभाग आणि आदिवासी-दुर्गम भागाचे दायित्व स्वीकारलेल्या आदिवासी विकास विभागाने या कुपोषित बालकांच्या सुदृढतेसाठी वेळीच उपाय शोधण्याची आवश्यकता आहे.या बालकांच्या पालकांना उन्हाळ्याप्रमाणे पावसाळ्यातदेखील कामांची उपलब्धता करणे अपेक्षित आहे. पोषक असलेल्या पोषण आहाराची खास व्यवस्था गरजेची आहे. शिवाय, कुपोषण औषधोपचार पथक तैनात करण्याची आवश्यकता दिसून येत आहे.याआधी दिल्या जाणाऱ्या खावटी कर्जाच्या स्वरूपातील आर्थिक मदतीप्रमाणे अन्नधान्याचा पुरवठा या कुपोषित बालकांच्या कुटुंबीयांना होणे अपेक्षित असल्याचे जाणकारांचे मत आहे.

टॅग्स :thaneठाणेHealthआरोग्यRainपाऊस