शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 07:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अंबरनाथ नगर परिषद निवडणूक मतदानाच्या दिवशी शनिवारी दुसऱ्या शहरातून बोगस मतदार आणल्याच्या आरोपामुळे शनिवारी शहरात एकच ...

लोकमत न्यूज नेटवर्कअंबरनाथ नगर परिषद निवडणूक मतदानाच्या दिवशी शनिवारी दुसऱ्या शहरातून बोगस मतदार आणल्याच्या आरोपामुळे शनिवारी शहरात एकच खळबळ माजली. पश्चिमेला एका मंगल कार्यालयाच्या सभागृहात महिलांची गर्दी जमल्याचे उघडकीस आल्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले. या हॉलमध्ये १७३ व्यक्ती आल्याचा प्रकार काँग्रेस आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी शनिवारी पहाटे उघडकीस आणला.

अंबरनाथ पश्चिमेला कोहोजगाव परिसरातील कृष्णा मॅरेज हॉल येथे काही महिला एकत्र जमल्या होत्या. हे नागरिक स्थानिक मतदार नसल्याचा दावा करण्यात येत असून बाहेरून, विशेषतः भिवंडी परिसरातून त्यांना बोगस मतदानासाठी आणल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस आणि निवडणूक विभागाच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत संबंधित महिलांना ताब्यात घेतले असून, चौकशी करण्यात आली.अंबरनाथमधील एका मंगल कार्यालयात महिला मोठ्या संख्येन एकत्र आल्या होत्या. बोगस मतदानासाठी त्यांना आणण्यात आले होते, असा आरोप कार्यकर्त्यांनी केला.

निवडणुकीत अनेक ठिकाणी अशांततानिवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अंबरनाथमध्ये शनिवारी सकाळी अनेक ठिकाणी दोन गटांत तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. कोळगाव परिसरात मतदान केंद्रात हाणामारीच्या घटना घडल्या. अनेक प्रभागांत मतदारांचा गोंधळ उडाला होता. त्यामुळे अनेक मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले.मतदान यंत्र बंद पडल्यामुळे अनेक ठिकाणी मतदारांना तासन् तास रांगेत उभे राहावे लागले. शिवनगर परिसरातील मतदान यंत्र दोन वेळा बंद पडल्याने गोंधळ निर्माण झाला होता. त्याच ठिकाणी कार्यकर्ते मतदान केंद्रात जात असल्याने वाद निर्माण झाला आणि त्यांच्यात बाचाबाची झाली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७३ व्यक्ती शासकीय अधिकाऱ्यांच्या आदेशाचा अवमान करून कृष्णा मॅरेज हॉल येथे एकत्र जमल्या होत्या. त्यांच्यावर गुन्हा दाखल केला असून, त्यांना नोटीस बजावून सोडण्यात आले. तसेच हॉलचे मालक कृष्णा रसाळ पाटील यांच्यावर विनापरवानगी काही व्यक्ती जमवल्याबद्दल कारवाई करण्यात येत आहे, अशी माहिती परिमंडळ ४ चे पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली.काँग्रेस, भाजपच्या कार्यकर्त्यांची हॉलवर धडकरॉयल पार्क, पाले गाव, चिखलोली कोहजगाव, स्वामीनगर भागातील अनेक मतदारांना स्थलांतरित केल्यामुळे त्यांना या केंद्रातून त्या केंद्रात भटकंती करावी लागली. अनेक ठिकाणी वादावादीच्या घटना घडल्याने दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना पोलिस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले होते.अंबरनाथच्या कृष्णा मॅरेज हॉलमध्ये काही महिला मोठ्या संख्येने एकत्रित आल्याची माहिती स्थानिक नागरिकांना मिळाली होती. त्यांनी राजकीय पक्षांना याची माहिती दिल्यानंतर काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी या हॉलवर धडक देत हा प्रकार उघडकीस आणला.रात्री दोन वाजता ही घटना उघडकीस आल्यानंतर राजकीय नेत्यांनी वरिष्ठ नेत्यांना फोन केले. दोन्ही बाजूकडून दबाव असल्याने या प्रकरणात काय करावे हे पोलिसांच्याही लक्षात आले नव्हते.

English
हिंदी सारांश
Web Title : 173 detained in Ambernath hall amid bogus voter allegations.

Web Summary : Tension gripped Ambernath during Nagar Parishad elections due to alleged bogus voters. 173 individuals were detained from a hall, sparking political clashes. Polling disruptions and altercations were also reported, leaving voters stranded and prompting police intervention.
टॅग्स :ambernathअंबरनाथLocal Body Electionमहाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५