शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे पोलीस आयुक्तालयात दोन दिवसांत १७ जण बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 00:52 IST

कोरोनावर मात करून घरी परतणाºया पोलिसांची संख्या मोठी असली तरी वाढत्या प्रादुर्भावामुळे चिंता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : शहर पोलीस आयुक्तालयात दोन दिवसांमध्ये दोन महिलांसह १७ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत १७७ पोलीस कोरोनामुळे बाधित झाले आहेत. तर १३ अधिकारी आणि ८९ कर्मचाऱ्यांनी कोरोनावर मात केली आहे.

कोरोनावर मात करून घरी परतणाºया पोलिसांची संख्या मोठी असली तरी वाढत्या प्रादुर्भावामुळे चिंता आहे. १ जूनला ठाणे शहर आयुक्तालयात मुख्यालयातील एका महिला कर्मचाºयासह तिघांना लागण झाली. तर, २ जूनला आणखी एकाला लागण झाली. मुख्यालयापाठोपाठ श्रीनगर, नारपोली पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक, राज्य राखीव दलाचे सहा, शीघ्र कृती पथकातील तिघे व नियंत्रण कक्षातील एका महिलेसह दोघे अशा १७ पोलिसांना कोरोना झाला आहे. या सर्वांवर कळव्यातील सफायर, भार्इंदर पाडा व भिवंडीतील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.पोलिसांना कोरोना होण्याचे प्रमाण वाढले असले तरी बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. आतापर्यंत १०२ पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. ही सकारात्मक बाब आहे. - विवेक फणसळकर,पोलीस आयुक्त, ठाणे शहरडहाणूतील सहा पोलीस कोरोनाबाधितडहाणू : डहाणू तालुक्यातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच असून आता त्यात नव्याने ७ रुग्णांची भर पडली आहे.डहाणू शहरासाठी ही चिंताजनक बाब असून डहाणू पोलीस स्टेशनमधील ६ पोलिसांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हे सर्वजण डहाणू शहरातील एका आत्महत्याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींच्या संपर्कात आले होते. आता या सहा जणांशी निकटचा संपर्क आलेल्या व्यक्तींची तपासणी करणे व कोरोनाला आळा घालण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे आहे. तसेच कासा येथील एका आरोपीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे तालुक्यातील कोरोनाग्रस्तांचा आतापर्यंतचा आकडा २४ वर पोहोचला आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस