शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात रस्त्यांच्या कामात १६ टक्के वाटप, कॉंग्रेसचा गंभीर आरोप; कामांची चौकशी करण्याची मागणी

By अजित मांडके | Updated: June 1, 2023 16:50 IST

ठाणे महापालिका क्षेत्रातील रस्ते दुरुस्तीसाठी तब्बल ६०५ कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

ठाणे :  राज्य शासनाकडून ठाणे शहरासाठी दोन टप्यात रस्त्यांच्या कामांसाठी ६०५ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. परंतु रस्त्यांची ही कामे मिळावीत यासाठी १६ टक्यांचे वापट झाल्याचा आरोप कॉंग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केला आहे. त्यातही रस्त्यांच्या कामांच्या निविदा भरताना १६ ते १० टक्क्यांपर्यंत कमी दराने निविदा भरण्यात आल्या असून रस्त्यांच्या कामांची तसेच यात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी पालिका आयुक्तांकडे करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

ठाणे महापालिका क्षेत्रातील रस्ते दुरुस्तीसाठी तब्बल ६०५ कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये पहिल्या टप्पयासाठी २१४ कोटी तर दुसºया टप्यासाठी ३९१ कोटींची तरतूद करण्यात आली असली दोन्ही टप्प्यांची कामे ही एकाच वेळी सुरु करण्यात आली आहे . रस्त्यांच्या कामांची ३१ मे ही शेवटची मुदत होती मात्र ही मुदत देखील संपली असून अजूनही रस्त्यांची कामे ही अर्धवटच असल्याचे समोर आले आहे. असे असताना आता रस्त्यांच्या कामातही अनियमितता झाली असल्याचा आरोप त्यांनी केला. रस्त्यांची कामे विशिष्ट ठेकेदारांना मिळावी यासाठी निविदा भरताना १६ ते १० टक्क्यांपर्यंत कमी दराने निविदा भरण्यात आल्या असून ही कामे मिळावी यासाठी १६ टक्क्यांचेही वाटप झाले असल्याचा आरोप त्यांनी केला. दुसरीकडे रस्त्यांच्या कामांच्या दजार्बाबतही प्रश्चचिन्ह उपस्थित करत या सर्व कामांचे छायाचित्र काढण्यात आले असून कामांची पोलखोल देखील केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प हा ५०० कोटींवरून आजच्या तारखेला साडेचार हजार कोटींवर गेला आहे. प्रत्येक वर्षी जर विकासकामांवर बजेटमधून २५ कोटी खर्च झाले असतील तर २५ वर्षात २५ हजार कोटी खर्च होऊनही ठाण्याच्या विकास का झाला नाही? ठाण्याचा विकास झाला नसल्यानेच ठाण्याच्या विकासासाठी शासनाकडून निधी आणावा लागत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. ठाण्याच्या विकासकामांची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: करतात. मुख्यमंत्र्यांसोबत आमदार फिरले तर आम्ही समजू शकतो मात्र त्यांच्यासोबत इतरही काही जण फिरत असून या कामांचे श्रेय घेणारे हे कोण असा प्रश्न उपस्थित करत चव्हाण यांनी थेट शिवसेनेचे ( शिंदे गट ) प्रवक्ते नरेश म्हस्के यांचे नाव घेऊन त्यांच्यावर टीका केली आहे. नरेश म्हस्के प्रमाणे मी सुद्धा माजी नगरसेवक असून हा पाहणी दौरा करताना सर्वांना विश्वासात घेतले पाहिजे असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेcongressकाँग्रेस