शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

१५० जणांवर चौकशीचा फास

By admin | Updated: April 15, 2016 01:31 IST

बांधकाम व्यावसायिक सुरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या चारही नगरसेवकांच्या बँक खात्यांतून ज्या १५० जणांना मोठ्या रकमा दिल्या गेल्या आहेत

ठाणे : बांधकाम व्यावसायिक सुरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या चारही नगरसेवकांच्या बँक खात्यांतून ज्या १५० जणांना मोठ्या रकमा दिल्या गेल्या आहेत, त्या सर्वांची चौकशी होणार आहे. त्यामुळे ऐन पालिका निवडणुकीच्या काळात ठाण्याचे राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. निवडून येण्याची क्षमता असलेल्यांवर चौकशीच्या आडून दबाव आणून ठाणे पालिका निवडणुकीत पक्षांतरासाठी प्रयत्न करण्याचा ‘कल्याण-डोंबिवली पॅटर्न’ या काळातही राबवला जाईल, अशी चर्चा विरोधकांत दबक्या आवाजात सुरू आहे.बिल्डर परमार यांच्या आत्महत्येनंतर सापडलेल्या डायरीमुळे ठाणे महापालिकेच्या चार नगरसेवकांना कारागृहात जावे लावले. आरोपपत्रानंतर आता चारही नगरसेवक जामिनावर सुटले आहेत. या प्रकरणाच्या तपासाचे, मालमत्तेचे स्रोत शोधण्याचे, रकमा कोणाकोणाला हस्तांतरित करण्यात आल्या, त्याचा माग काढण्याचे आणि प्राप्तिकर विभागाच्या छाप्यातील डायरीमधील सांकेतिक नावांचा शोध घेण्याचे काम विशेष शोधपथक (एसआयटी) करीत आहे. या चारही नगरसेवकांनी त्यांचा मित्र परिवार, निकटवर्ती, काही व्यावसायिक हितसंबंध असलेल्यांना मोठमोठ्या रकमा दिल्या आहेत. त्यांच्या बँक नोंदीच्या आधारे साधारण १५० जणांची चौैकशी होणार असून त्यांच्याकडून खुलासा मागवला जाणार आहे. एकंदरीतच या चारही नगरसेवकांशी भक्कम आर्थिक संबंध असलेले राजकीय नेते, त्यांचे आर्थिक पुरवठादार यांच्याभोवती लवकरच चौकशीचा फास आवळला जाण्याची चिन्हे आहेत. तसे झाले तर ऐन निवडणुकीच्या तेजीच्या काळात ठाण्यातील विविध पक्षांतील अनेक राजकीय नेते आणि त्यांच्या मित्र परिवारातील व्यक्तींना चौकशीच्या टांगत्या तलवारीखाली वावरावे लागण्याची शक्यता आहे. पोलिसांमार्फत चौकशीचा ससेमिरा टाळायचा असेल तर त्यांनी त्यांच्या पक्षातून बाहेर पडावे, यासाठी त्यांच्यावर दबाव आणण्याची रणनीतीही राबवली जात असल्याचे सांगितले जाते. त्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या गेल्या महिन्यातील ठाणे दौऱ्याचा, जाताजाता त्यांनी पालिका आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत केलेल्या चहापानाचा संदर्भ दिला जात आहे.ठाण्यातही फोडाफोडी फॉर्म्युला विधानसभा, कल्याण-डोंबिवलीसह इतर महापालिका निवडणुकांत भाजपाने ज्या प्रकारे इतर पक्षांतील निवडून येण्याच्या क्षमतेचे उमेदवार आपल्या पक्षात घेऊन आपली संख्या वाढवली, त्याचीच पुनरावृत्ती ठाण्यात होण्याची शक्यता वर्तवली जात होती. सध्याच्या सात नगरसेवकांची संख्या भाजपाला ७७ करायची असल्याने फोडाफोडी होणार, हे गृहीत धरले जात आहे. त्यासाठी चौकशीचा ससेमिरा लावला जाईल, असा आरोप विरोधकांनी आधीच केला होता आणि भाजपा नेत्यांनी तो फेटाळलाही होता.कल्याण-डोंबिवलीचा कित्ता गिरवणार?वेगवेगळ्या जुन्या गुन्ह्यांच्या फायली उघडून आणि चौकशीचा फेरा मागे लागेल, असे धमकावून पक्षांतरासाठी दबाव येत असल्याचा आरोप कल्याण-डोंबिवली पालिका निवडणुकीवेळी भाजपावर झाला होता. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी गृहखात्याचा वापर केल्याचा दावा करण्यात आला होता. त्याच्या निषेधार्थ एकनाथ शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मंत्रीपदाचा राजीनामाही दिल्याने त्या निवडणुकीला नाट्यमय वळण लागले होते. त्याचाच कित्ता ठाण्यात परमार प्रकरणातून गिरवला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे ते १५० जण कोण, याचा अंदाज घेऊनच अनेक जण धास्तावले आहेत.