शहरं
Join us  
Trending Stories
1
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
2
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
3
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
4
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
5
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
6
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
7
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
8
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
9
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
10
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
11
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
12
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
13
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
14
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
15
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
16
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
17
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
18
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
19
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
20
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल

दंडाच्या कचाट्यात १५० इमारती

By admin | Updated: July 12, 2016 02:32 IST

शहरातील जी बांधकामे अधिकृत आहेत, पण त्यांना भोगवटा दाखला मिळालेला नाही, अशा इमारतींना (दुप्पट मालमत्ताकर) दंड लावण्याचा प्रकार पालिकेने केला आहे

राजू काळे,  भार्इंदरशहरातील जी बांधकामे अधिकृत आहेत, पण त्यांना भोगवटा दाखला मिळालेला नाही, अशा इमारतींना (दुप्पट मालमत्ताकर) दंड लावण्याचा प्रकार पालिकेने केला आहे. अशा इमारतींना दंड न लावण्याचा आदेश तत्कालीन आयुक्त शिवमूर्ती नाईक यांनी २०११ मध्ये दिला होता. त्याला कर विभागाने केराची टोपली दाखवली आहे. यामुळे अनेक वर्षांपासून १५० इमारतींमधील रहिवासी दंड रद्द करण्यासाठी पालिकेचे उंबरठे झिजवत आहेत.राज्य सरकारने १९८८ मध्ये पालिका हद्दीतील बेसुमार वाढलेल्या अनधिकृत बांधकामांवरील उपाययोजनेसाठी माजी सनदी अधिकारी दिनेश अफजलपूरकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. समितीने तयार केलेला अहवाल यापूर्वीच्या युती सरकारला १९९८ मध्ये सादर केला. त्यात पालिका अधिनियमातील कलम २६७ (अ) प्रमाणे अनधिकृत बांधकामांना दंड आकारण्याची शिफारस केली होती. त्याचा निर्णय युती सरकारकडून प्रलंबित राहिल्यानंतर १ एप्रिल २००८ रोजी आघाडी सरकारने त्याची अंमलबजावणी केली. त्यानुसार, मीरा-भार्इंदर पालिकेच्या १० एप्रिल २००८ च्या महासभेत बेकायदा इमारतींना दंड लावण्याचा ठराव मंजूर केला. त्यात ज्या इमारतींना नगररचना विभागाने बांधकाम प्रारंभपत्र दिले आहे, त्या इमारतींचे बांधकाम मंजूर नकाशाप्रमाणे झाले आहे. पण, त्यांनी भोगवटा दाखला न घेताच सदनिका विकून त्यांचा वापर सुरू केला. त्याची तपासणी करून बेकायदा बांधकाम अथवा ठरावीक जागेत वाढीव बांधकाम केल्याचे निदर्शनास आल्यास कर विभागाने केवळ अशा बांधकामांना दंडाचा निर्णय घेतला. परंतु, कर विभागाने सरसकट संपूर्ण इमारतीलाच दंड लावण्याचा विक्रम केला. कर विभागाच्या या भोंगळ कारभारामुळे संतप्त रहिवाशांनी दंडास नकार दिला. अशा प्रकारे अनेक इमारतींना कर विभागाने दंडाच्या कक्षेत आणल्याने त्यांनी प्रशासनासह राजकारण्यांकडे धाव घेतली. त्यावर, तत्कालीन आयुक्त नाईक यांनी ३१ मे २०११ रोजी आदेश काढून त्यात ज्या इमारतींना परवानगी दिली आहे, त्यांचे बांधकाम मंजूर नकाशाप्रमाणे पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र वास्तुविशारदाकडून नगररचना विभागाला मिळाले असल्यास, परंतु भोगवटा दाखला घेतला नसल्यास अशा इमारतींना दंड लावू नये, असे निर्देश दिले. या आदेशाला काही बुद्धिजीवी अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवून दंड आकारणी सुरूच ठेवली. त्यात कहर म्हणजे स्थानिक लेखा निधी यांनीही त्यांच्या लेखा अहवालातील आक्षेपामध्ये भोगवटा दाखला न घेतलेल्या इमारतींकडून दंड वसूल करण्याचे समर्थन केले.