शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात मलनिस्सारण केंद्राची भिंत कोसळून 15 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, तर दोन जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2018 10:50 IST

कॅम्प नं -3 वडोलगावात मलनिस्सारण केंद्राची भिंत संततधार पावसाने रात्री दीड वाजण्याच्या सुमारास एका घरावर कोसळली.

उल्हासनगर : शहरातील कॅम्प नं -3 वडोलगावात मलनिस्सारण केंद्राची भिंत संततधार पावसाने रात्री दीड वाजण्याच्या सुमारास एका घरावर कोसळली. यामध्ये 15 वर्षीच्या मुलाचा मृत्यू झाला असून, दोन जण जखमी झाले. पालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेऊन धोकादायक भिंती काढण्याचे काम भर पावसात सुरू केले आहे.उल्हासनगर कॅम्प नं - 3 येथील वडोलगाव शेजारी मलनिस्सारण केंद्र उभारण्याचे काम सुरू आहे. केंद्राचे काम करतेवेळी निघालेली माती, दगड भिंती शेजारी टाकण्यात आली. संततधार पावसामुळे मातीचा भार भिंतीवर आल्याने रात्री दीड वाजण्याच्या सुमारास घायवट त्यांच्या घरावर कोसळली. भिंत कोसळल्याने परिसरात एकच आक्रोश सुरू झाला. स्थानिक नगरसेवक गजानन शेळके, कविता तोरणे-रगडे, समाजसेवक शिवाजी रगडे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन घायवट कुटुंबाला नातीच्या ढिगाऱ्या खालून काढण्यात आले. मात्र दुर्दैवाने घरात भिंतीशेजारी झोपलेला 15 वर्षाचा किरण धायवट याचा जागीच मृत्यू झाला, तर काका सूर्यकांत घायवट गंभीर जखमी झाले. आई आशा किरकोळ जखमी झाली.महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन इतर घरावर कोलमडलेली भिंत बाजूला करण्याचे काम सुरू केले. महापालिका व मलनिस्सारण केंद्र ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे एकाच बळी गेल्याचा आरोप शिवाजी रगडे यांनी केला. महापालिका आयुक्तांनी संबंधित ठेकेदार व पालिका अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी रगडे यांनी करून कुटुंबाला नुकसानभरपाई देण्याची मागणीही केली आहे. वडोळगावला जाणाऱ्या वालधुनी नदीवरील पुलाचे काम अर्धवट असल्याने शालेय मुलासह नागरिकांना 3 ते 4 किमीचा वळसा घालून अंबरनाथ पुलावर जावे लागते. पालिकेने शालेय मुलांसाठी मोफत बससेवा सुरू केली आहे. 

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर