शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे 1427 नवे रुग्ण; 30 जणांचा मृत्यू   

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2020 20:07 IST

 ठाणे महापालिकेच्या कार्यक्षेत्रात 208 नवे रुग्ण सापडले आहेत. यासह शहरात 25 हजार 721रुग्णांची आजपर्यंत नोंद झाली आहे.

ठाणे : जिल्ह्यातून कोरोनाच्या एक हजार 427 रुग्णांना शोधून रविवारी त्यांची नोंद घेण्यात आली आहे. या रुग्णांसह आजपर्यंत एक लाख 22 हजार 965 रुग्ण जिल्ह्यात झाले आहेत. तर 30 जणांचा मृत्यू झाल्यामुळे जिल्ह्यात तीन हजार 519 मृतांची नोंद आतापर्यंत करण्यात आल्याची माहिती जिल्हा शासकीय रूग्णालयाच्या अहवालावरुन उघड झाली आहे.           ठाणे महापालिकेच्या कार्यक्षेत्रात 208 नवे रुग्ण सापडले आहेत. यासह शहरात 25 हजार 721रुग्णांची आजपर्यंत नोंद झाली आहे. याशिवाय आठ जणांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या 834 झाली आहे. कल्याण - डोंबिवली मनपात 363 रुग्ण नव्याने आढळून आले. तर 11 जणांचा आज मृत्यू झाल्यामुळे या शहरातील मृतांची संख्या 620 झाली. तर 28 हजार 637 रुग्ण बाधीत झाल्याची नोंद आजपर्यंत करण्यात आली आहे.  

                नवी मुंबई मनपात476 रुग्णांची नोंद झाली असून पाच रुग्ण आज दगावले आहेत. आता बाधितांची संख्या 25 हजार 860 तर, मृत्यूची संख्या 581वर गेली आहे. उल्हासनगरला 34 रुग्ण नव्याने आढळले आहेत. या शहरात आतापर्यंत सात हजार 757 बाधीत रुग्णांची नोंद घेण्यात आली. तर आज एकाचा मृत्यू झाल्यामुळे 225 मृतांची नोंद आजपर्यंत झाली आहे.               भिवंडी मनपा.कार्यक्षेत्रात 12 रुग्ण नव्याने सापडले आहेत. मात्र आज एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. यासह आजपर्यंत चार हजार 180 बाधीतांची तर 283 मृतांची नोंद झाली आहे. मीरा भाईंदर महापालिकेमध्ये 125 रुग्णांची तर एका जणाच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. या शहरात बाधीत संख्या 12 हजार 456 तर, 420 मृतांची आजपर्यंत नोंद झाली आहे.             अंबरनाथ शहरात 40 रुग्ण नव्याने आढळून आले असून तीन मृत्यू झाले आहेत. या शहरात आता चार हजार 939  बाधीत तर,185 मृतांची नोंद झाली आहे. याप्रमाणेच बदलापूरमध्ये 32 रुग्ण आज सापडले आहेत. त्यामुळे बाधीत रुग्ण चार हजार 77 झाले आहेत. आज एकही मृत्यू झालेला नसल्यामुळे मृत्यूची संख्या 71 कायम आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्राही 137 रुग्णांची वाढ झाली असून एक मृत्यू झाला आहे. या गांवपाड्यांत आतापर्यंत नऊ हजार 338 बाधीत रुग्णांची तर 300 मृतांची नोंद झाली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस