शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई महापालिकेत नोकरीचे आमिष दाखवून १४ जणांची फसवणूक

By जितेंद्र कालेकर | Updated: September 27, 2018 21:49 IST

आपण मुंबई महापालिकेत अधिकारी असल्याचे सांगत तुम्हालाही पालिकेत नोकरीस लावतो, अशी बतावणी करुन ठाण्यातील १४ जणांना १८ लाखांचा गंडा घालणाऱ्या तिघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे.

ठळक मुद्दे१८ लाखांना गंडा : तिघांना अटकठाणे गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाईठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा

ठाणे : मुंबई महापालिकेत नोकरीला लावण्याच्या आमिषाने १४ जणांची १८ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी दत्तात्रेय ऊर्फ तुषार धुरी, राहुल केळकर आणि प्रकाश गायकवाड या तिघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ ने अटक केली आहे. त्यांना ३ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.कोपरीतील श्रीकांत जोईल यांना त्यांचे नातेवाईक सुमित जोईल यांच्या ओळखीचे डोंबिवलीतील रहिवासी दत्तात्रेय धुरी हे मुंबई महापालिकेमध्ये एचआर विभागात अधिकारी असल्याचे सांगितले. तर, प्रकाश आणि प्रिया गायकवाड या दाम्पत्यासह राहुल केळकर या तिघांनीही मुंबई महापालिकेत वरिष्ठ अधिकारी असल्याची बतावणी केली. महापालिकेतील वरिष्ठ अधिकाºयांशी ‘सेटिंग’ करून तुमच्या नातेवाइकांना पालिकेमध्ये नोकरीला लावून देऊ, अशी त्यांनी जोईल यांच्याकडे बतावणी केली. त्यांचा विश्वास संपादन केल्याने त्यांनी त्यांच्या नातेवाइकांनाही या ‘अधिकाºयांची’ माहिती दिली. त्यानुसार, श्रीकांत जोईल यांचा मुलगा, मुलगी, पुतण्या, इतर नातेवाईक तसेच इतर परिचित आदी १४ जणांकडून रोख आणि बँक ट्रान्सफरद्वारे (आरटीजीएस) १८ लाख पाच हजारांची रक्कम ठाण्याच्या कुंजविहार हॉटेलजवळ स्वीकारली. त्यानंतर, त्यांना महापालिका अधिकाºयांच्या बनावट स्वाक्षºयांचे नियुक्तीपत्र, वैद्यकीय चाचणी करण्यासाठीचे पत्र दिले. आॅक्टोबर २०१७ ते मे २०१८ या कालावधीत हा प्रकार घडला. प्रत्यक्षात यातील कोणालाही नोकरीला लावले नाही. या सर्वांनी महापालिकेच्या (बीएमसी) मुख्यालयात चौकशी केली. त्यावेळी अशा नावाचे कोणीही अधिकारी महापालिकेत नोकरी करत नसल्याचीही बाब समोर आली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या १४ जणांनी आपले पैसे परत मिळण्यासाठी धुरीसह चौघांकडे पाठपुरावा केला. मात्र, चौघांनीही चालढकल केली. अखेर, श्रीकांत जोईल यांनी याप्रकरणी दत्तात्रेय धुरी, राहुल केळकर, प्रकाश आणि प्रिया गायकवाड या चौघांविरुद्ध ठाणेनगर पोलीस ठाण्यात २५ सप्टेंबर २०१८ रोजी गुन्हा दाखल केला. दरम्यान, हे प्रकरण गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे आणि सहायक पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या पथकाने २६ सप्टेंबर रोजी राहुल केळकर आणि प्रकाश गायकवाड यांना, तर २७ सप्टेंबर रोजी धुरीला अटक केली. या चौकडीचे आणखीही साथीदार असून त्यांनी आणखी किती जणांना गंडा घातला, याचाही तपास करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी