शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

सदनिकेच्या व्यवहारात ठाण्यातील चहाविक्रेत्याची १४ लाखांनी फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 17:39 IST

वागळे इस्टेटमधील एका दाम्पत्याने त्यांची एकच सदनिका दोघांना विकली. ठाण्यातील एका साधारण चहा विक्रेत्याची या व्यवहारात १४ लाख रुपयांनी फसवणूक झाली.

ठळक मुद्देएकच सदनिका दोघांना विकलीदाम्पत्याविरूद्ध गुन्हा दाखलवर्षभरापासून आरोपी फरार

ठाणे : एकच सदनिका दोघांना विकून एका चहाविक्रेत्याची १४ लाख रुपयांनी फसवणूक ठाण्याच्या दाम्पत्याविरूद्ध वागळे इस्टेट पोलिसांनी शनिवारी गुन्हा दाखल केला. पैसे घेतल्यापासून आरोपी कुटुंब फरार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.वागळे इस्टेट येथील अंबिका नगरातील एकता संघटन चाळीचे रहिवासी अशोक शंकर भाविक यांचे चहाचे लहानसे हॉटेल आहे. भाविक यांचे चाळीतील घर जुने झाले असून, ते आर्थिकदृष्ट्या परवडेल अशी सदनिका विकत घेण्याच्या विचारात होते. त्याच दरम्यान रामचंद्रनगर येथील वैतीवाडीतील श्रद्धा सोसायटीमध्ये ७0१ क्रमांकाच्या खोलीत राहणारे राधेश्याम गोविंद बारिक यांनी त्यांची राहती सदनिका विक्रीस काढली. भाविक आणि बारिक यांच्यात या सदनिकेचा सौदा ठरला. जवळपास २५ लाख रुपयांमध्ये सौदा निश्चित झाल्यानंतर जून २0१५ पासून भाविक यांनी सदनिकेचा मोबदला देण्यास सुरूवात केली. जून २0१५ ते आॅक्टोबर २0१६ या कालावधीत भाविक यांनी धनादेशाद्वारे १४ लाख रुपये राधेश्याम बारिक आणि त्यांच्या पत्नी मिनाती बारिक यांना दिले. दुसरीकडे बारिक दाम्पत्याने त्यांच्या सदनिकेचा व्यवहार आणखी एका ग्राहकाशी केला. या ग्राहकाजवळून बारिक दाम्पत्याने सदनिकेचा पूर्ण मोबदला घेतला. त्यानंतर सदनिकेचा ताबा त्या ग्राहकाला देऊन आरोपींनी पोबारा केला. या व्यवहारात अशोक भाविक यांच्याजवळची संपूर्ण जमा रक्कम गेली असून, सदनिकेचा ताबा दुसर्‍यालाच मिळाला आहे. एकाच सदनिकेचा दोघांकडून मोबदला मिळवल्यानंतर आरोपी दाम्पत्य फरार झाले. जवळपास वर्षभरापासून त्यांचा ठावठिकाणा नसल्याची माहिती तपास अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक अनिकेत पोटे यांनी दिली. आरोपी दाम्पत्यासह त्यांच्या दोन्ही मुलांचेही फोन बंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली. भाविक यांच्या तक्रारीवरून वागळे इस्टेट पोलिसांनी शनिवारी राधेश्याम बारिक आणि त्यांची पत्नी मिनाती बारिक यांच्याविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. 

टॅग्स :thaneठाणेCrimeगुन्हा