शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पाणी बिलांची १३३ कोटींची वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:37 IST

ठाणे : महापालिका प्रशासनाने राबविलेल्या विशेष मोहिमेत आतापर्यंत पाणी बिलापोटी १३३ कोटींची वसुली झाली आहे. गेल्यावर्षी ४ मार्चपर्यंत ...

ठाणे : महापालिका प्रशासनाने राबविलेल्या विशेष मोहिमेत आतापर्यंत पाणी बिलापोटी १३३ कोटींची वसुली झाली आहे. गेल्यावर्षी ४ मार्चपर्यंत ११८.६५ कोटी रुपयांची वसुली झाली होती. मात्र, यंदा कोरोना टाळेबंदीमुळे ऑगस्ट महिन्यापासून पाणी देयकांची वसुली सुरू झाली असली तरी ती गेल्या वर्षीच्या तुलनेत १४.३५ कोटी अधिक झाली आहे. तर मार्च अखेरपर्यंत आयुक्तांनी प्रस्तावित केलेले १५० कोटींचे लक्ष पार करू, असा विश्वास पाणीपुरवठा विभागाने व्यक्त केला आहे.

कोरोना रोखण्याच्या कामात महापालिकेची यंत्रणा व्यस्त होती. यामुळे जुलै महिना अखेरपर्यंत मालमत्ता कर आणि पाणी देयकांची वसुली होऊ शकली नव्हती. त्यामुळे महापालिकेची आर्थिक घडी विस्कटली. या पार्श्वभूमीवर आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दोन्ही करांच्या वसुलीसाठी विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले. त्यानुसार ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून प्रशासनाने कर वसुलीवर भर दिला. यासाठी अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांच्या नेतृत्वाखाली पथके कार्यरत केली. या मोहिमेत चालू आणि मागील वर्षांच्या पाणी देयकांची वसुली केली जात आहे. यात थकबाकी देण्यास टाळाटाळ करणाऱ्यांची नळजोडणी तोडली जात असून ४ मार्चपर्यंत ३ हजार ६९० नळजोडण्या तोडल्या आहेत. यामुळे आतापर्यंत एकूण १३३ कोटी रुपयांची वसुली झाली आहे. थकबाकीदारांसाठी व्याज १०० टक्के माफ केल्यामुळे या योजनेचा लाभ अनेक करदात्यांनी घेतला असून आतापर्यंत १६.९४ कोटींची वसुली झाली आहे. यामध्ये ६.२१ कोटी प्रशासकीय आकार माफ केला आहे.

ऑनलाईनला कर भरण्याला पसंती

मालमत्ता कराप्रमाणे ठाणेकरांनी पाणी बिलाची रक्कम ऑनलाईन भरण्यावर भर दिला आहे. ४ मार्चपर्यंत १०.८९ कोटींची वसुली केली आहे.

* २५ कोटी उद्दिष्ट केले कमी

महापालिका क्षेत्रात एकूण दीड लाख घरगुती तर ६ हजार ५०० वाणिज्य नळ जोडणीधारक आहेत. पाणी देयकांच्या वसुलीपोटी अर्थसंकल्पामध्ये १७५ कोटींचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र, ते कमी करून आता १५० कोटी केले आहे. गेल्यावर्षी १३३ कोटींची वसुली झाली होती. त्यामुळे येत्या मार्च अखेरपर्यंत १३३ कोटीं ऐवजी १५० कोटींचा आकडा गाठणे शक्य होईल, अशी माहिती महापालिका सूत्रांनी दिली.