शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

१३२० बालकांचे आरटीईचे प्रवेश पालकांनी नाकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2019 02:17 IST

या सोडतीमध्ये निवड होऊनही बहुतांशी बालकांचे प्रवेश संबंधित पालकांनी विविध कारणांमुळे दिलेल्या शाळा नाकारल्या आहेत.

ठाणे : शिक्षणाचा हक्क या कायद्याखालील २५ टक्के आरक्षणातील शालेय प्रवेशासाठी दुसऱ्या राउंडमध्ये जिल्ह्यातील दोन हजार ६४३ बालकांची निवड झाली. मात्र, यातील एक हजार ३१४ बालकांचे प्रवेश घेण्यात आले. उर्वरित एक हजार ३२० बालकांचेप्रवेश घेण्यासाठी संबंधित पालक दिलेल्या शाळांकडे फिरकलेच नसल्याने त्यांनी शालेय प्रवेश घेणे टाळल्याचे अहवालावरूनउघड झाले आहे. शुक्रवारी तिसºया राउंडच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची सोडत काढून प्रवेशासाठी निवड केली जाणार आहेया २५ टक्के आरक्षणातील शालेय प्रवेश ६५२ शाळांमध्ये घेतले जात आहेत. यासाठी दुसºया राउंडमध्ये जिल्ह्यातील दोन हजार ६४३ विद्यार्थ्यांची सोडत काढून निवड करण्यात आली.यापैकी एक हजार ३१४ बालकांचे प्रवेश दिलेल्या शाळेत घेण्यात आले. यामध्ये अंबरनाथ तालुक्यातील १५२ विद्यार्थ्यांसह भिवंडी शहरातील ८३, भिवंडी ग्रामीणमधील ३६, कल्याण ग्रामीणचे १३५, केडीएमसी शहरातील १४६, मीरा-भार्इंदरमधील १५, मुरबाडचे आठ, नवी मुंबईतील ३८८, शहापूरचे ५२, ठाणे मनपा २६२ आणि उल्हासनगर शहरातील ३७ विद्यार्थ्यांचे संबंधित शाळांमध्ये प्रवेश झाले आहेत.ही आहेत पालकांच्या नकाराची कारणेया सोडतीमध्ये निवड होऊनही बहुतांशी बालकांचे प्रवेश संबंधित पालकांनी विविध कारणांमुळे दिलेल्या शाळा नाकारल्या आहेत. यामध्ये लांब असलेली शाळा नाकारण्यासह कागदपत्रांचा अभाव, त्यातील त्रुटी, भविष्यात येणारा शालेय खर्च भरण्याची भीती, दरमहा बसभाडे भरण्याची क्षमता नसणे आदी कारणांमध्ये बहुतांशी पालकांनी बालकांचे संबंधित शाळांमध्ये प्रवेश घेणे नाकारल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये नवी मुंबईतील सर्वाधिक ४४१ बालकांचे प्रवेश पालकांनी नाकारले आहे. याखालोखाल ठाणे मनपा-२ क्षेत्रातील २१८, तर सर्वाधिक कमी मुरबाड तालुक्यात चार बालकांचे प्रवेश दिलेल्या शाळांमध्ये घेण्यात आले नसल्याचे उघड झाले आहे.

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदा