शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

वित्त आयोगाचे ठाणे-पालघरला १३२ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 02:29 IST

चौदाव्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशींनुसार राज्यातील ३७८ स्थानिक स्वराज्य संस्थांना मूलभूत अनुदानाचा ११०२ कोटी रुपयांच्या अनुदानाचा पहिला हप्ता नगरविकास विभागाने वितरित करण्यास बुधवारी मान्यता दिली.

- नारायण जाधव ठाणे : चौदाव्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशींनुसार राज्यातील ३७८ स्थानिक स्वराज्य संस्थांना मूलभूत अनुदानाचा ११०२ कोटी रुपयांच्या अनुदानाचा पहिला हप्ता नगरविकास विभागाने वितरित करण्यास बुधवारी मान्यता दिली. यात ठाणे जिल्ह्यातील सात स्थानिक स्वराज्य संस्थांना १२० कोटी ९६ लाख नऊ हजार ५७७ रुपये, तर पालघर जिल्ह्यास ११ कोटी सहा लाख ९१ हजार १५३ रुपये, असे १३२ कोटी १२ लाख ७३० रुपये मिळाले आहेत. यात दोन्ही जिल्ह्यांतील महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींचा समावेश आहे.या निधीतून दोन्ही जिल्ह्यांतील १४ स्थानिक स्वराज्य संस्थांना आपल्या कार्यक्षेत्रात मूलभूत सुविधा पुरवणे सोपे होणार आहे. यात वॉटर, मीटर, गटरसह शौचालयांची कामे करता येतील, शिवाय रखडलेल्या पाणीयोजनांना चालना देता येणार आहे.पालघर जिल्ह्याला ११ कोटीपालघर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जव्हार नगरपालिका ६२ लाख ३८ हजार ५९९, डहाणू नगरपालिका दोन कोटी ६५ लाख ८५ हजार ६०, पालघर नगरपालिका चार कोटी २३ लाख ४१ हजार ५८५, विक्रमगड नगरपंचायत ५७ लाख ६६ हजार १३३, तलासरी नगरपंचायत एक कोटी १९ लाख ८० हजार ३७८, वाडा नगरपंचायत ९५ लाख ८० हजार ८१ आणि मोखाडा नगरपंचायत ८१ लाख ९९ हजार ३१७ अशा एकूण ११ कोटी सहा लाख ९१ हजार १५३ रुपयांचा समावेश आहे.>ठाण्यात सर्वाधिकअनुदान मीरा-भार्इंदरलाया निधीतून या स्थानिक स्वराज्य संस्थांनी मूलभूत सुविधा पुरवायच्या आहेत. ठाणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये उल्हासनगर महापालिका २४ कोटी १८ लाख ४५ हजार ८६९ रुपये, भिवंडी महापालिका ३४ कोटी तीन लाख ५९ हजार २५७ रुपये, मीरा-भार्इंदर महापालिका ३९ कोटी ५६ लाख २७ हजार ९१४ रुपये, कुळगाव-बदलापूर नगरपालिका आठ कोटी ८० लाख २७ हजार सात रुपये, अंबरनाथ नगरपालिका १२ कोटी ५८ लाख ८४ हजार २८९ रुपये यासह मुरबाड नगरपंचायत एक कोटी १४ लाख २५ हजार ४२८ आणि शहापूर नगरपंचायत ६४ लाख ३९ हजार ४२८ रुपयांचा समावेश आहे.

टॅग्स :MONEYपैसा