शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडी पालिका क्षेत्रात १३११ इमारती धोकादायक; शेकडो कुटुंबीयांचा जीव टांगणीला

By नितीन पंडित | Updated: June 10, 2024 16:39 IST

अशा धोकादायक इमारतींवर पालिका प्रशासनाने कठोर कारवाई करून भविष्यात होणारी दुर्घटना व त्यामुळे होनरी जीवितहानी टाळावी अशी अपेक्षा आहे.

भिवंडी: शहरात पावसाळ्याच्या सुरुवातीला धोकादायक व अति धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर असतानाच शहरात १३११ इमारती धोकादायक व अति धोकादायक असल्याची माहिती मनपा प्रशासनाने दिली आहे.यात सुमारे ३ हजार कुटुंबातील १५ हजार नागरिक जीव मुठीत घेऊन वास्तव्य करीत आहेत.

          भिवंडीतील इमारत दुर्घटनांच्या घटना पाहता आता पर्यंत ९० हुन अधिक बळी गेले आहेत.त्या पार्श्वभूमीवर शहरातील धोकादायक व अती धोकादायक इमारतींवर कारवाई करण्याचे निर्देश असताना लोकसभा निवडणूक कामात अनेक पालिका कर्मचारी दोन महिने व्यस्त असल्याने त्याकडे दुर्लक्ष झाले होते.भिवंडी पालिका क्षेत्रातील पाच प्रभाग समिती अंतर्गत १३११ इमारती धोकादायक घोषित केल्या आहेत. ज्यामध्ये २८७ इमारती अती धोकादायक आहेत.यामध्ये इमारतींसह कौलारू घरे,यंत्रमाग कारखाना यांचा समावेश आहे. 

          प्रभाग समिती क्रमांक एक अंर्तगत १२५ धोकादायक इमारती आहेत ज्यामध्ये अती धोकादायक सी १ श्रेणीतील इमारतींची संख्या ३२ आहे.तर इमारत निर्मनुष्य करून दुरुस्ती करण्याच्या सी २ ए श्रेणीत १७,इमारती मध्ये राहून दुरुस्ती करण्याच्या सी २ बी  श्रेणीत ६६ तर किरकोळ डागडुजी करण्यालायक सी ३ श्रेणीत १० इमारतींचा समावेश आहे .प्रभाग समिती क्रमांक दोन अंर्तगत ३१० इमारती धोकादायक घोषित करण्यात आल्या आहेत .ज्यामध्ये सी १ च्या श्रेणीत ४१ इमारती,सी २ ए श्रेणीत १९५,सी २ बी श्रेणीत ७० तर सी ३ श्रेणीत ४ इमारतींचा समावेश आहे.         प्रभाग समिती क्रमांक तीन अंर्तगत २३४ इमारती धोकादायक घोषित करण्यात आल्या आहेत.या मध्ये सी १ श्रेणीत ६०,सी २ ए श्रेणीत ४२,सी २ बी श्रेणीत ९९ तर सी ३ श्रेणीत ३३ इमारतींचा समावेश आहे.प्रभाग समिती क्रमांक चार अंर्तगत २८४ इमारती धोकादायक म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत.सी १ श्रेणीत  ८४ इमारती,सी २ ए श्रेणीत १९९,सी २ बी प्रणित ८९ तर सी ३ श्रेणीत १ इमारतींचा समावेश आहे.तर प्रभाग समिती क्रमांक पांच अंर्तगत सर्वाधिक ३५८ इमारती धोकादायक घोषित करण्यात आल्या आहेत.यामध्ये सी १ श्रेणीत ८० इमारती असून सी २ ए श्रेणीत ११८,सी २ बी श्रेणीत १५८ व सी ३ श्रेणीत २ इमारतींचा समावेश आहे.          अशा धोकादायक इमारतींवर पालिका प्रशासनाने कठोर कारवाई करून भविष्यात होणारी दुर्घटना व त्यामुळे होनरी जीवितहानी टाळावी अशी अपेक्षा आहे.यातील अनेक इमारती अनधिकृत पद्धतीने उभ्या राहिल्या असतानाच जमीन मालक व पगडी पद्धतीने फ्लॅट्स घेतलेले कुटुंबीय यांच्या वादात असंख्य इमारती निर्मनुष्य करण्यात अडचणी येत आहेत.धोकादायक इमारतींवर कारवाई करण्यासाठी प्रशासन सज्ज असून संभाव्य दुर्घटना होण्याच्या भीतीने अनेक धोकादायक इमारती खाली करण्यासाठी संबंधित कुटुंबीयांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत.तर अनेक धोकादायक इमारती निर्मनुष्य करण्यात आल्या असून अशा इमारतींचा वापर होऊ नये यासाठी  तेथील वीज व पाणी पुरवठा खंडित करण्यात आला आहे.तर धोकादायक व अती धोकादायक इमारतींच्या दर्शनी भागावर सदर इमारत धोकादायक असल्या बाबतचे बोर्ड लावण्यात आले आहेत अशी माहिती पालिका प्रशासना कडून देण्यात आली आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडी