शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

१३ वर्षांच्या देवश्रीने २२ मिनिटे लावून ठेवली नाकाला जीभ; लंडन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदला विश्वविक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2023 07:05 IST

गिनीजमध्ये नोंदीकरिता प्रयत्न सुरू

- अजित मांडके

ठाणे : तुमची जीभ नाकाला लागते का हो भाऊ?, बर जीभ नाकाला लावण्याचा कधी प्रयत्न केला आहे का? आणि प्रयत्न केला असेल तर त्याचाही वर्ल्ड रेकॉर्ड होऊ शकतो, याची माहिती आहे का तुम्हाला ? एक १३ वर्षांची मुलगी देवश्री अमर ठोकळ हिने तब्बल २२ मिनिटे जीभ नाकाला लावून ठेवण्याचा एक आगळा-वेगळा विक्रम प्रस्थापित केला. लंडन बुक ऑफ रेकॉर्डसह, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये तिचा हा विक्रम नोंदला गेला. देवश्री सध्या बंगळुरू येथे इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेत आहे. 

मुलुंड येथे वास्तव्यास असलेले अमर ठोकळ यांची ती कन्या आहे. गेल्यावर्षी २५ डिसेंबर २०२१ रोजी एका मॉलमध्ये फिरत असताना त्याठिकाणी एक पुस्तक चाळत असताना एका व्यक्तीने ८ मिनिटे जीभ नाकाला लावून गिनीज बुकमध्ये विक्रमाची नोंद केल्याचे ठोकळ यांच्या वाचनात आले. त्यांची मुलगी देवश्री लहानपणापासून नाकाला जीभ लावत असल्याचे ते पाहत होते. अमर यांनी देवश्रीला एकदा विचारले की, तू बराच काळ नाकाला जीभ लावून बसू शकते का? देवश्रीने तत्काळ होकार दिला. आठ महिन्यांपूर्वी तिने वडिलांना सांगितले की, बाबा मी नाकाला जीभ लावून २१ मिनिटे तशीच राहू शकते. मुलीचे हे म्हणणे ऐकून तेदेखील थक्क झाले.

वडिलांनी एका कॅमेरामनच्या मदतीने मुलीचा व्हिडीओ शूट केला. देवश्रीने २२ मिनिटे जीभ नाकाला लावल्याची त्यात नोंद झाली. त्यांनी इंडिया बुक ऑफ रेकॉर्डला याची माहिती दिली. तेथे विक्रमाची नोंद घेतली गेली. पुढे युनिक बुक ऑफ रेकॉर्ड, लंडनच्या वर्ल्ड बुक ऑफ रेकार्डमध्येही देवश्रीच्या विक्रमाची नोंद झाली. आतापर्यंत पाच विक्रमांची नोंद तिच्या नावावर झाली आहे. गिनीज बुकमध्ये विक्रमाची नोंद करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र, वयामुळे तिला याठिकाणी नाकारण्यात आले. गिनीजमध्ये सध्या ५० मिनिटे एका व्यक्तीने जीभ नाकाला लावण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे. तो विक्रम मोडण्याची देवश्रीची तयारी सुरू आहे.

टॅग्स :thaneठाणे