शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीच्या आमिषाने १३ मुलींची फसवणूक; सिंधुदुर्गमध्ये गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2019 23:49 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या १३ तरुणींकडून नोकरीसाठी प्रत्येकी अडीच हजार रु पये घेऊन एका संस्थेने त्यांना ठाण्यात आणले होते.

ठाणे : कोकणातील मुलींना ठाण्यातील एका कॉलसेंटरमध्ये नोकरीस लावण्याच्या नावाखाली पैसे उकळल्याचा प्रकार शुक्रवारी उघड झाला. त्यांना नोकरी देण्याऐवजी विविध ठिकाणी फिरवले जात होते. त्याची माहिती शिवसेनेच्या नगरसेवकांना मिळाल्यानंतर त्यांनी त्यांची गुरुवारी सुटका करून त्यांना एका खासगी बसने त्यांच्या गावी सुखरूप पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या १३ तरुणींकडून नोकरीसाठी प्रत्येकी अडीच हजार रु पये घेऊन एका संस्थेने त्यांना ठाण्यात आणले होते. त्यांना एका कॉलसेंटरमध्ये काम देण्याचे प्रलोभनही दाखवले होते. परंतु, ठाण्यात १ जुलै रोजी आणल्यानंतर रेल्वेस्थानक परिसरातील एका लॉजमध्ये त्यांना ठेवले होते. त्यानंतर, नोकरी देणे दूरच राहिले, त्यांच्या खाण्याचीही आबाळ केली जात होती. या लॉजनंतर त्यांना किसननगर येथील एका खोलीत आणून ठेवले. एकाच वेळी १३ मुलींना एका घरात आणून ठेवल्याबद्दल परिसरातील नागरिकांना संशय आला. त्यांनी याची माहिती शिवसेनेचे नगरसेवक योगेश जानकर यांना दिली. त्यांनी थेट या मुलींना ठेवलेल्या खोलीकडे धाव घेऊन त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना सोबतच्या दोन युवकांकडून विविध ठिकाणी फिरवले जात असल्याची माहिती त्यांना मिळाली.यानंतर, या दोन युवकांना शिवसेना स्टाइलने समजावण्यात आले. त्यानंतर, या मुलींच्या पालकांशी दूरध्वनीवरून जानकर तसेच या मुलींनी संवाद साधला. या मुलींकडे घरी जाण्यासाठी तिकिटाचे पैसे नसल्याने जानकर यांनी खासगी बस उपलब्ध करून दिली. तसेच सिंधुदुर्ग येथील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर संवाद साधून या मुलींना फसवणाऱ्यांना त्यांच्या स्वाधीन करण्यात आले.या दोघांविरोधात आता सिंधुदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला जाणार आहे. तसेच त्यांना नोकरीची फूस लावणाºया एका महिलेचाही शोध घेतला जात आहे. याच महिलेने अशा प्रकारे आणखी काही मुलींची फसवणूक केल्याची शक्यता व्यक्त होत आहे. या प्रकाराने मुली राहत असलेल्या परिसरात खळबळ उडाली आहे.‘‘सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक प्रशिक्षण शिबिर होते. याच शिबिरामार्फत एका खासगी संस्थेतील दोघांनी या मुलींकडून नोकरीसाठी पैसे घेऊन ठाण्यात आणले. हा प्रकार संशयास्पद वाटल्यानंतर गुरुवारी या सर्व मुलींची किसननगरमधून सुटका केली.’’- योगेश जानकर, नगरसेवक, शिवसेना, ठाणे

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी