शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

कॉरिडोरमध्ये १२८ गावे, भूसंपादन प्रक्रिया सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 04:47 IST

ठाण्यासह पालघर, रायगड या तिन्ही जिल्ह्यांतील १२८ गावांतून जाणाऱ्या विरार-अलिबाग बहुउपयुक्त महामार्गाच्या (मल्टिमोडल कॉरिडोर) ‘नवघर ते चिरनेर’ या पहिल्या टप्प्यातील मार्गासाठी एक कोटी ८५ लाख १५ हजार ५७१ चौरसमीटर जागेच्या संपादनाचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे.

- सुरेश लोखंडेठाणे : ठाण्यासह पालघर, रायगड या तिन्ही जिल्ह्यांतील १२८ गावांतून जाणाऱ्या विरार-अलिबाग बहुउपयुक्त महामार्गाच्या (मल्टिमोडल कॉरिडोर) ‘नवघर ते चिरनेर’ या पहिल्या टप्प्यातील मार्गासाठी एक कोटी ८५ लाख १५ हजार ५७१ चौरसमीटर जागेच्या संपादनाचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. या प्रकल्पाच्या भूसंपादनाबाबतची जनसुनावणी शुक्रवारी डोंबिवलीत झाली.जिल्ह्यात समृद्धीसारख्या महामार्गांसह बुलेट ट्रेन, मेट्रो, बहुउपयुक्त महामार्गांचे जाळे ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांत पसरणार आहे. त्यासाठी शेतजमिनीसह वनखाते, शासन आदींच्या जमिनीचे संपादन सुरू आहे. ठाणे जिल्ह्यातील जमिनीसाठी ठाणे जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील यांनी शुक्रवारी डोंबिवली येथील वरदसिद्धिविनायक सेवा भवनमध्ये जनसुनावणी घेतली.या बहुउपयुक्त महामार्गांसाठी संपादित होणाºया जमिनीपैकी ठाणे जिल्ह्यातील २७ गावांच्या शेतकºयांची ३२ लाख ५३ हजार ३९८.१३ चौ.मी. शेतजमीन बाधित होणार आहे. यामध्ये भिवंडी तालुक्याच्या १३ गावांतील शेतकºयांची २० लाख २६ हजार ५१७.४६ चौ.मी. शेतजमिनीससह ठाणेच्या एका गावातील शेतकºयांची ३२ हजार ९६६.८७ चौ.मी. शेतजमीन, कल्याणच्या आठ गावांमधील ७ लाख ०२ हजार ६४०.४९ चौ.मी. आणि अंबरनाथच्या पाच गावांतील शेतकºयांची ४लाख ९१ हजार २७३.३१ चौ.मी. खाजगी शेतजमीन या प्रकल्पामुळे बाधित होणार आहे. याशिवाय, शासकीय तीन लाख ५६ हजार ५३०.५३ चौ.मी., मिठागराची सुमारे १३ हजार ३५१.८६ चौ.मी. आणि रेल्वे व इतर विभागांची एक हजार ४८१.२२ चौ.मी. जागेचे संपादन हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी ठाणे जिल्ह्यातील वनविभागाची जमीन मात्र बाधित होत नसल्याची माहिती आहे.याशिवाय, पालघर जिल्ह्यातील वसई येथील सात गावांमधील शेतकºयांची २ लाख ५६ हजार २८३.४९ चौ.मी. शेतजमीन, शासकीय ४० हजार ४१४.५६ चौ.मी., वनविभागाची ९७ हजार ५२३.०७ चौ.मी., मिठागरांची २ हजार ७७२.३५ चौ.मी. आणि रेल्वेसह इतर विभागांची ६ हजार ३९४.१७ चौ.मी. जमीन बाधित होत आहे.रायगड जिल्ह्यातील पनवेलची ४३ गावे, उरणची ११ गावे, पेणची २१ आणि अलिबागची १९ आदी ९४ गावांतील शेतकºयांची ७६लाख १८ हजार २७१.५१ चौ.मी. शेतजमीन या प्रकल्पासाठी संपादित होणार आहे. या जिल्ह्यातील शासकीय मालकीची १०लाख १४ हजार १६२.३७ चौ.मी., वनविभागाची ५ लाख ६८ हजार २४६.७७ चौ.मी., मिठागरांची ३५ हजार ३४७.०७ चौ.मी. आणि रेल्वेसह अन्य विभागांच्या मालकीची २१ हजार ७५८ चौ.मी. जमीन संपादित करण्याचे काम सुरू झाले आहे.जेएनपीटी बंदराला होणार फायदाविरार ते अलिबाग या कॉरिडोअरमुळे पालघर-ठाणे-रायगड तिन्ही जिल्हे जवळ येणार असून याचा सर्वाधिक फायदा प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासह जेएनपीटी बंदराला होणार आहे. येथील कंटेनर वाहतूक शीघ्रगतीने यामुळे पश्चिम किनारपट्टीसह ठाणे आणि भिवंडीतील गोदामपट्ट्यात आणणे सोपे होणार आहे.मेट्रोही धावणारया मार्गालगत मेट्रोचे नियोजन असून त्यासाठी ३२ स्थानके प्रस्तावित आहेत. संपूर्ण मार्ग आठ पदरी असून त्यासाठी २१ उड्डाणपूल,पाच टनेल, ४० मोठे आणि ३२ छोटे पूल प्रस्तावित आहेत. यामुळे विरार ते अलिबाग हे प्रवासाचे अंतर निम्म्याने कमी होणार आहे.प्रकल्पाचा खर्च दुप्पटएमएमआरडीएने या प्रकल्पाचा आराखडा तयार केला, तेव्हा तो १२९७५ कोटी रुपयांचा होता. यात पहिल्या टप्प्यातील नवघर ते चिरनेर हा ७९ किमीचा मार्ग बांधण्याचे प्रस्तावित असून त्यावर ९३२६ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. तर, दुसºया टप्प्यातील चिरनेर ते अलिबाग ४७ किमी मार्गाच्या बांधणीसाठी ३६४९ कोटी रुपये खर्च प्रस्तावित केला होता. परंतु, आता विहित मुदतीत या प्रकल्पाचे काम सुरू न झाल्याने त्याचा खर्च २२,३०० कोटींवर गेला असून त्याकरिता एमएमआरडीएने जागतिक बँकेकडे निधीची मागणी केल्याचे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :thaneठाणेnewsबातम्या