शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे रुग्णालयातील १२० डॉक्टर संपावर; पालिका आयुक्तांनी घेतली तातडीची बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 06:35 IST

संपाच्या काळात रुग्णांचे हाल होऊ नये, यासाठी रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांसह कोविड काळात नेमणूक केलेल्या डॉक्टरांपैकी ४० डॉक्टरांची तुकडी रुग्णालयात नेमली आहे, अशी माहिती रुग्णालय प्रशासनातर्फे देण्यात आली.

ठाणे : प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी निवासी डॉक्टरांची संघटना मार्डने पुकारलेल्या राज्यव्यापी संपात साेमवारपासून ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी रुग्णालयातील १२० निवासी डॉक्टर सहभागी झाले आहेत. त्याचा परिणाम बाह्यरुग्ण कक्षावर दिसून आला. मात्र, दिवसभरात एकही शस्त्रक्रिया रद्द केली नसल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाने केला आहे. दिवसभरात ११ शस्त्रक्रिया झाल्या असून, नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात  आल्या नसल्याचे सांगण्यात आले. संपाच्या काळात रुग्णांचे हाल होऊ नये, यासाठी रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांसह कोविड काळात नेमणूक केलेल्या डॉक्टरांपैकी ४० डॉक्टरांची तुकडी रुग्णालयात नेमली आहे, अशी माहिती रुग्णालय प्रशासनातर्फे देण्यात आली. साेमवारी पाच मोठ्या, तर सहा लघू शस्त्रक्रिया झाल्या. संपाचा परिणाम ओपीडीवर दिसून आला. 

पालिका आयुक्तांनी घेतली तातडीची बैठकसंपाची दखल घेत पालिका आयुक्त अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त मनीष जोशी तसेच छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. योगेश शर्मा आदींची तातडीची बैठक झाली. निवासी डॉक्टरांनी संपातून माघार घेऊन रुग्णांची काळजी घेतल्यास मागण्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पालिका आयुक्त बांगर यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाdoctorडॉक्टर