शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता सुरक्षा अभियानात ठाण्यातील १२ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 22:15 IST

वाहतूक नियंत्रण शाखेतर्फे ४ ते १० फेब्रुवारी २०१९ दरम्यान रस्ता सुरक्षा अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या दरम्यान पथनाटय, निबंध अशा विविध स्पर्धा घेण्यात येणार असून यामध्ये ठाण्यातील २५० शाळा आणि ४० महाविद्यालयातील १२ हजार विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

ठळक मुद्देवाहतूक नियमनासाठी मदत करणाऱ्या १४ नागरिकांचा विशेष सत्काररस्ता सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन वेगावर नियंत्रण ठेवून अपघात टाळा - मधुकर पांडेय

ठाणे: वाहन चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवल्यास गंभीर स्वरुपाचे अपघात होणार नाहीत. वाहतूक नियमनासाठी स्वयंस्फूर्तीने काम करणा-या नागरिकांकडूनही इतरांनी प्रेरणा घ्यावी. साधे नियम पाळूनही आपण ‘सडक सुरक्षा जीवन रक्षा’ हे ब्रीद सार्थकी लावू शकतो, असे आवाहन ठाण्याचे सह पोलीस आयुक्त मधुकर पांडेय यांनी सोमवारी केले.ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक नियंत्रण शाखेतर्फे ४ ते १० फेब्रुवारी २०१९ दरम्यान रस्ता सुरक्षा अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानाचे उद्घाटन साकेत पोलीस कवायत मैदानावर पांडेय यांच्या हस्ते झाले. त्यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना त्यांनी हे आवाहन केले. वाहतूकीचे नियम न पाळल्याने अपघातांमध्ये अनेकांचा मृत्यु तर अनेक जण गंभीर जखमी झाल्याच्या घटना बहुतांश वेळा घडतात. त्यामुळे यंदा केंद्र शासनाने सडक सुरक्षा जीवन रक्षा हे ब्रीद घेऊन रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा करण्याचे आवाहन केले आहे. याच अनुषंगाने वेगावर नियंत्रण ठेवा, वाहतूकीचे नियम पाळा आणि अपघात टाळा, असे आवाहन करतांनाच विद्यार्थ्यांनी वाहतूक नियमांची जनजागृती करावी, असेही पांडेय यावेळी म्हणाले. ठाणे, उल्हासनगर आणि डोंबिवली परिसरात वाहतूक कोंडीच्या वेळी काही दक्ष नागरिक उत्स्फूर्तपणे कोंडी सोडविण्यासाठी रस्त्यावर उतरतात. अशा नागरिकांकडूनही इतरांनी प्रेरणा घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.यावेळी ठाण्यातील मनोहर वसानी, गिरीश पाटील, डोंबिवलीतील सुप्रिया कुलकर्णी आणि विश्वनाथ बिवलकर अशा १४ वाहतूक स्वयंसेवकांचा सत्कार पांडेय यांच्या हस्ते करण्यात आला.रस्ता सुरक्षा अभियानात निबंध, चित्रकला अशा विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून त्यासाठी ठाण्यातील २५० शाळा आणि ४० महाविद्यालयातील १२ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. या अभियानामध्ये वाहतूक आणि रस्ता सुरक्षा विषयक जनजागृती करण्यात येणार आहे. त्यात विरु ध्द दिशेने प्रवास करणार नाही, मद्य प्राशन करु न वाहन चालविणार नाही, निष्कारण हॉर्न वाजविणार नाही, अतिवेगाने गाडी चालविणार नाही, परवान्यापेक्षा जास्त संख्येने रिक्षामध्ये प्रवास करणार नाही, घातक पध्दतीने ओव्हरटेक करणार नाही आदी अनेक वाहतूकीच्या विषयांचा समावेश राहणार आहे. दरम्यान, यावेळी एनसीसीच्या १५ पथकांनी आणि पोलिसांनी शानदार संचलन केले.यावेळी वाहतूक नियमाचे धडे देणा-या रोबोटने विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. वाहतूक पोलिसांनी उपस्थितांसोबत रस्ता सुरक्षेची शपथ घेतली. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील, पोलीस उपायुक्त अमित काळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणेtraffic policeवाहतूक पोलीस