शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

भाईंदरच्या जैन संघाने दिली कोरोना रुग्णालयासाठी १२ स्वयंचलित गरम पाणी यंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 19:31 IST

मीरा भाईंदरमधील कोरोना रुग्ण व कोरोनाच्या संशयितांसाठी महापालिकेने भाईंदरचे जोशी रुग्णालय फक्त कोरोना उपचाराकरिता राखीव केले आहे.

मीरारोड - भाईंदरच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात कोरोनाग्रस्त व संशयितांना पिण्याच्या गरम पाण्याची आवश्यकता पाहता भाईंदरच्या व्यंकटेश पार्क येथील जैन संघाच्या वतीने स्वयंचलीत पाण्याची १२ यंत्रे दिली आहेत. शिवाय पंतप्रधान निधीत २ लाखांचा धनादेश दिला आहे.मीरा भाईंदरमधील कोरोना रुग्ण व कोरोनाच्या संशयितांसाठी महापालिकेने भाईंदरचे जोशी रुग्णालय फक्त कोरोना उपचाराकरिता राखीव केले आहे. सदर रुग्णालयात कोरोना बाधित तसेच कोरोनाचे संशयित असे सुमारे ५० जणं उपचारासाठी दाखल आहेत. या लोकांना गरम पाणी पिणे आवश्यक असून डॉक्टरसुद्धा गरम पाणी पिण्यास सांगतात. परंतु रुग्णालयात गरम पाण्यासाठी तरतूद नसल्याने आमदार गीता जैन यांनी कोरोना विरोधातील लढ्यात आवश्यक ती मदत करण्याचे आवाहन शहरातील जैन संघांना केले होते.त्या आवाहनास प्रतिसाद देत भाईंदरच्या व्यंकटेश पार्क मधील श्री शंखेश्वर शणगार जैन श्वेतांबर मूर्तिपूजक संघ तपागच्छ जैन संघ रथाकार जिनालय ने पालिकेच्या जोशी रुग्णालयासाठी नामवंत कंपनीची स्वयंचलित गरम, ठंड व साधे पाणी येणारी १२ यंत्रे देणगी स्वरुपात दिली आहेत. या वॉटर डिस्पेंसरमुळे आता जोशी रुग्णालयातील कोरोना रुग्ण व संशयितांना पिण्यासाठी गरम व शुध्द पाणी उपलब्ध झाले आहे. कोरोनाचा आजार बरा होण्यात व वाढ रोखण्यात गरम पाण्याची भूमिका सुद्धा उपयोगी असल्याने जैन मंदिर संघाच्या वतीने ही यंत्रे देण्याचा निर्णय घेतला गेल्याचे संघाच्या वतीने विक्रम मुठलिया यांनी सांगितले.सदर यंत्रे महापालिका आयुक्त चंद्रकांत डांगे यांच्या कडे सुपुर्द करण्यात आली. या शिवाय जैन संघाने २ लाखांचा धनादेश पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी आयुक्तां कडे दिला आहे. यावेळी आमदार गीता जैन सह जैन मंदिरा संघाचे जसवंत जैन, श्रेणिक शाह, विक्रम मुठलिया, संदिप जैन आदी प्रमुख उपस्थित होते. आ. गीता जैन यांनी शहरातील विविध धर्मियांची धर्मस्थाने, संस्था, विकासक, व्यापारी आदिंना सुध्दा मदतीसाठी येण्याचे आवाहन केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस