शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अकरावी प्रवेशावेळी प्रमाणपत्रांसाठी ६ महिने मुदतवाढ द्या -  डावखरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2020 16:05 IST

नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र सादर करण्यास सहा महिन्यांची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी कोकण पदवीधर मतदारसंघातील आमदार निरंजन वसंत डावखरे यांनी शिक्षण खात्याकडे केली आहे.

ठाणे : अकरावी ऑनलाइन प्रवेश अर्जावेळी आवश्यक करण्यात आलेला विद्यार्थ्याचा जातीचा दाखला, अधिवास आणि नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र सादर करण्यास सहा महिन्यांची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी कोकण पदवीधर मतदारसंघातील आमदार निरंजन वसंत डावखरे यांनी शिक्षण खात्याकडे केली आहे.

कोरोनाच्या संसर्गाने लागू केलेला लॉकडाऊन आता काही प्रमाणात  शिथिल होत असतानाच, अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश अर्जाचा पार्ट 1 भरताना विद्यार्थ्याचा स्वत:चा जातीचा दाखला, विद्यार्थ्याचे महाराष्ट्रातील अधिवासाचे प्रमाणपत्र व उन्नत गटात मोडत नसल्याचे (नॉन क्रिमीलेयर) प्रमाणपत्र अपलोड करणे अनिवार्य केले आहे. सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता संबंधित कागदपत्रे जमा करताना विद्यार्थी व पालकांची धावपळ उडणार आहे.

तहसील कार्यालयाशी संलग्न सेतू कार्यालयातून संबंधित कागदपत्रे मिळविण्यासाठी अर्ज करावा लागतो. कोरोनाच्या आपत्तीत महसूल विभागाचे बहुसंख्य कर्मचारी आपत्कालीन व्यवस्थेसाठी कार्यरत आहेत. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्यास मर्यादा येतील. त्याचबरोबर या प्रमाणपत्रांसाठी तहसील कार्यालयात गर्दी उसळण्याची भीती आहे, याकडे डावखरे यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे लक्ष वेधले आहे. या पार्श्वभूमीवर जातीचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्राशिवाय नियमांच्या अधीन राहून अकरावीची प्रवेशप्रक्रिया पूर्ण करावी. तसेच संबंधित विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे दाखल करण्यासाठी सहा महिन्यांची अट ठेवावी, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे.

टॅग्स :Niranjan Davkhareनिरंजन डावखरे