शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

शहापूर, मुरबाड आणि कर्जतमध्ये धान्यखरेदीत ११.५० कोटींचा घोटाळा ; १४ जणांवर गुन्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2023 08:41 IST

आमदार दरोडा यांच्या पुतण्याचाही समावेश?

ठाणे : आदिवासी विकास महामंडळांतर्गत केलेल्या धान्यखरेदीत घाेटाळा झाला असून शहापूर, मुरबाड, कर्जतमध्ये साडेअकरा कोटींची अफरातफर झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या घाेटाळ्याप्रकरणी १४ जणांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले असून शहापूरच्या घाेटाळ्यात आमदार दौलत दरोडा यांचे पुतणे हरीश यांचा समावेश असल्याचे तपासात पुढे आले आहे.

  या प्रकरणात यापूर्वीच तीन अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. शहापूरच्या वेहळोली केंद्रात ६,४६६.४२ क्विंटल धान्य आणि बारदाना यांचा दोन कोटी ७३ लाखांचा गैरव्यवहारा झाला. किन्हवली पोलिस ठाण्यात  अविनाश राठोड आणि विजय गांगुर्डे या माजी अधिकाऱ्यांसह विपणन निरीक्षक महेश येवले आणि केंद्रप्रमुख प्रवीण पाटील यांच्यावर गुन्हे दाखल आहेत.

मुरबाड तालुक्यातील न्याहाडी केंद्रात १९,९९१ क्विंटल धान्य आणि ४९,९७९ बारदाना असा सहा कोटी २८ लाख ११,१८० रुपयांचा घोटाळा उघडकीस आला असून, टोकावडे पोलिस ठाण्यात अविनाश राठोड, विजय गांगुर्डे या माजी अधिकाऱ्यांसह गोविंद भला, रमेश घावट, नानू वाघ, अजय घस्ते यांच्यावर गुन्हे नोंदवले आहेत. या घोटाळ्याची व्याप्ती  राज्यभर असल्याचा आरोप आमदार संजय केळकर यांनी केला आहे.

मोठ्या व्यक्तींची नावे समोर येण्याची शक्यता

कर्जत पोलिस ठाण्यातही ८६ लाख ५,०६७ रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी चारजणांवर गुन्हा दाखल झाला आहे. यात विजय गांगुर्डे आणि अविनाश राठोड यांच्यासह किसन वारघडे आणि प्रकाश पाटील यांचा समावेश आहे. या घोटाळ्याचा आणखी तपास सुरू असून यात काही मोठ्या व्यक्तींचे नाव समोर येण्याची शक्यता आहे.