शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

स्मार्ट सिटींचे 112 प्रकल्प कार्यादेश मिळण्याच्या प्रतीक्षेत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2021 08:04 IST

smart cities : गेल्या तीन वर्षांत मुंबई महानगर प्रदेशातील ठाणे महापालिकेने ११३ कोटी २३ लाख रुपयांचे २० प्रकल्प, तर सर्वात तळाला असलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिकेने चार कोटी ६६ लाख रुपयांचे तीन प्रकल्प पूर्ण केलेले आहेत.

- नारायण जाधवठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील स्मार्ट सिटीअंतर्गत महाराष्ट्रातील औरंगाबाद, कल्याण-डोंबिवली, नागपूर, नाशिक, पिंपरी-चिंचवड, पुणे, सोलापूर आणि ठाणे या आठ शहरांची चार फेऱ्यांमधून जानेवारी २०१६ ते जून २०१८ या काळात स्मार्ट सिटी म्हणून निवड झाली. यात एकूण २३ हजार ३० काेटी रुपयांचे २८२ प्रकल्प मान्यतेसाठी धाडले. यापैकी ९ जुलै २०२१ पर्यंत राज्याचे तीन हजार ४७१ कोटी ३४ लाख १२८ रुपयांचे प्रकल्पच पूर्ण झाले आहेत. यासाठी केंद्र सरकारने गेल्या तीन वर्षांत आपल्या हिश्श्याचा दोन हजार १२८ कोटी २३ लाख रुपयांचा निधी दिला असून, त्यातील या शहरांनी एक हजार ९२० कोटी ९२ लाख रुपये खर्च केले. अजूनही १३ हजार ४०२ कोटी ३९ लाख रुपयांचे ११२ प्रकल्प कार्यादेश मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

गेल्या तीन वर्षांत मुंबई महानगर प्रदेशातील ठाणे महापालिकेने ११३ कोटी २३ लाख रुपयांचे २० प्रकल्प, तर सर्वात तळाला असलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिकेने चार कोटी ६६ लाख रुपयांचे तीन प्रकल्प पूर्ण केलेले आहेत. ठाणे महापालिकेच्या एकूण सहा हजार १०२ कोटी ४७ लाख रुपयांच्या ४१ प्रकल्पांपैकी पाच हजार ७५० कोटी रुपयांचे २०, तर कल्याण-डोंबविली महापालिकेचे एक हजार ५५५ कोटी १५ लाख रुपयांच्या १९ प्रकल्पांपैकी एक हजार तीनशे ९५ कोटी ४८ लाख रुपयांचे १३ प्रकल्प कार्यादेशाच्या प्रतीक्षेत आहेत, तर निविदा प्रक्रियेत ठाणे महापालिका २३९ कोटींचा एक, तर कल्याण-डोंबिवली महापालिकेचे १५५ कोटींचे तीन प्रकल्प आहेत.

नागपूर पालिकेची बाजीस्मार्ट सिटीअंतर्गत राज्यात सर्वाधिक प्रकल्प नागपूर महापालिकेने ९९४ कोटी ४१ लाख रुपयांचे तीन प्रकल्प, तर पुणे महापालिकेने ८३७ कोटी ८५ लाख रुपयांचे २७ प्रकल्प पूर्ण केले आहेत. त्याखालोखाल नाशिक महापालिका ६४९ कोटी २२ लाखांचे २६ प्रकल्प, औरंगाबाद महापालिका ४४१ कोटी ४७ लाखांचे १२ प्रकल्प, सोलापूर महापालिका ३२५ कोटी ८४ लाखांचे २८ प्रकल्प पूर्ण केले आहेत.

आठ महापालिकांची चिंता वाढलीऔरंगाबाद २८३ कोटींचे १० प्रकल्प, कल्याण-डोंबिवली महापालिका एक हजार तीनशे ९५ कोटी ४८ लाख रुपयांचे १३ प्रकल्प, ठाणे महापालिकेचे पाच हजार ७५० कोटी रुपयांचे २० प्रकल्प, नागपूर महापालिका दोन हजार ४२ कोटींचे चार प्रकल्प, नाशिक महापालिका २७४ कोटी ५० लाखांचे दोन प्रकल्प, पिंपरी-चिंचवड महापालिका ८३ कोटींचे दोन प्रकल्प, पुणे महापालिका दोन हजार १३९ काेटी ८२ लाखांचे १२ प्रकल्प, सोलापूर ९९६ कोटी पाच लाखांच्या १३ प्रकल्पांचा समावेश आहे. केंद्र सरकारने स्मार्ट सिटी योजना गुंडाळण्याचे संकेत दिले आहेत. यामुळे आधीच कोविडमुळे संकटात सापडलेल्या राज्यातील या आठ महापालिकांना आता निविदा प्रक्रियेतील आणि कार्यादेश मिळण्याच्या प्रतीक्षेतील प्रकल्प कसे पूर्ण करायचे याची चिंता सतावू लागली आहे.

टॅग्स :thaneठाणे