शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवली निवासी आणि औद्योगिक विभागातील रस्त्यांकरीता ११० कोटीचा निधी मंजूर- श्रीकांत शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 19:21 IST

खासदार शिंदे यांनी सांगितले की, डोंबिवली निवासी आणि औद्योगिक परिसरातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे.

कल्याण- डोंबिवली निवासी आणि औद्योगिक विभागातील रस्त्यांकरीता ११० कोटीचा निधी मंजूर करण्यात आल्याने या भागातील रस्ते विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे. या कामाच्या निविदाही लवकर काढल्या जाणार असल्याची माहिती कल्याणचे शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आज दिली आहे. या संदर्भात माहिती देण्यासाठी त्यांनी एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या पत्रकार परिषदेला शिवसेनेच गोपाळ लांडगे, सदानंद थरवळ, प्रकाश म्हात्रे, दिपेश म्हात्रे,विश्वाथ राणे, विनीता राणे, राजेश मोरे, राजेश कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

खासदार शिंदे यांनी सांगितले की, डोंबिवली निवासी आणि औद्योगिक परिसरातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. २७ गावे महापालिकेतून वगळणो आणि पुन्हा समाविष्ट करणो यामुळे या भागातील रस्त्यांच्या विकासाला अडसर होता. या रस्ते विकासाच्या कामासाठी औद्योगिक विकास महामंडळासह महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला. रस्त्यांची दुरुस्ती आणि कॉन्क्रीटीकरण रखडले असल्याची बाब दोन्ही सरकारी संस्थांच्या निदर्शनास आणून दिली. जानेवारी महिन्यात महामंडळाचे कार्यकारी अभियंता डॉ. पी.  अनबलगन यांच्यासोबत बैठक पार पडली होती.

महापालिका आणि महामंडळ रस्ते विकासासाठी प्रत्येकी 50 टक्के खर्च करणार आहे. औद्योगिक भागातील फेज वनमध्ये १० किलोमीटर आणि फेज टू मध्ये ११ किलोमीटर आणि निवासी वसाहतीमधील १३ किलोमीटर लांबीचे रस्ते सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचे होणार आहेत. महापालिकेने ४० टक्के रस्त्यासाठी निविदा काढल्यावर महामंडळाकडून ६० टक्के कामे हाती घेतली जाणार आहेत. त्यानुसार महापालिका ५५ कोटी १५ लाख रुपयांचा निधी महामंडळाकडे वर्ग करण्यात येणार आहे. तसा प्रस्तावही महापालिकेने महासभेत यापूर्वीच मंजूर केला आहे. तर महामंडळाकडून पायाभूत सुविधा प्रकल्पांतर्गत ५७ कोटी ३७  लाख रुपये अनुदान स्वरुपात देण्याचे आदेश दिले आहेत. नगरविकास खात्याकडून १५ कोटीचा निधी मंजूर

दरम्यान महापालिका हद्दीतील पायाभूत सोयी सुविधांच्या विकासासाटी नगरविकास खात्याने  १५ कोटी ५५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या विकास कामाचे प्रस्ताव महापालिकेकडून सादर करण्यात आले आहे. त्यानुसार या कामाच्या निविदा काढल्या जाणार आहेत. त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. नगरविकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निधी विकासासाठी देऊ केला आहे.

टॅग्स :Shrikant Shindeश्रीकांत शिंदेkalyanकल्याणdombivaliडोंबिवलीkdmcकल्याण डोंबिवली महापालिकाShiv Senaशिवसेना