शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यातील ११ ग्रा. पं.च्या मुदत पूर्व निवडणुकीसाठी आरक्षण सोडत सुरू!

By सुरेश लोखंडे | Updated: February 10, 2024 19:00 IST

४३१ ग्राम पंचायतींकडून ग्रामीण, दुर्गम भागातील गांवखेड्यांचा कारभार पाहिला जात आहे.

ठाणे: जिल्ह्यात ४३१ ग्राम पंचायतींकडून ग्रामीण, दुर्गम भागातील गांवखेड्यांचा कारभार पाहिला जात आहे. त्यापैकी यंदा ११ ग्राम पंचायतींच्या सरपंच, उपसरपंच आणि सदस्यंचा कार्यकाळ संपणार आहे. तेथे मुदत पूर्व निवडणुका होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यास अनुसरून प्रभाग रचना आधीच झाली असता आता आरक्षण सोडत काढण्याचे काम जिल्ह्यातील संबंधीत तालुक्यांमध्ये सुरू करण्यात आलेले आहे.

जिल्ह्यातील या ग्राम पंचायतींचीा जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपत आहे. त्यांच्या या निवडणुकीचा कार्यक्रम हाती घेण्यास अनुसरून तेथे आधीच प्रभाग रचना निश्चित करण्यात आलेल्या असून आता संबंधीत उपविभागीय अधिाकारी आणि तहसीलदार यांच्या नियंत्रणात आरक्षण सोडत काढण्याचा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. हा कार्यक्रम कल्याण, भिवंडी, शहापूर, आणि मुरबाड तालुक्यातील या ११ ग्राम पंचायतींच्या निवडणुकीची ही पूर्व तयारी सुरू करण्यात आलेली आहे.

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये कल्याणमधील चवरे-म्हसरुंडी, दहागाव, रोहण-अंताडे, पोई या ग्राम पंचायतींचा समावेश आहे. तर भिवंडीमधील महापोली, अनगाव ग्राम पंचायती आहे. शहापूरच्या साकुली, सावरोली बुद्रक ग्रा.पं. आहेत. याप्रमाणेच मुरबाड तालुक्यातीलझाडघर, न्याहाडी, दहिगाव ग्राम पंचायतींसाठी सध्या आरक्षण सोडतचा कार्यक्रम जारी करण्यात आलेला आहे.

प्रभाग निहाय आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमाचे नियोजनआदेश जारी झाल्याप्रमाणे विशेष ग्राम सभेची सुचना ७ फेब्रुवारीपर्यंत देण्यात आलेल्या होत्या. त्यानंतर ९ फेब्रुवारीपर्यंत आरक्षण सोडत काढण्याची कारवाई पूर्ण झाली आहे. तर या आरक्षण सोडतच्या प्रारूप अधिसुचनेला ठाणे जिल्हाधिकारी १२ जानेवारीपर्यंत मान्यता देणार आहे. यानंतर १३ फेब्रुवारीला प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारूप प्रसिद होईल. त्यावर हरकती व सुचाना १६ फेब्रुवारीपर्यंत घेतल्या जात आहे. त्यावर उपविभागीय अधिकारी यांनी २१ फेब्रुवारीपर्यंत अभिप्राय देऊन त्यास जिल्हाधिकारी यांनी २३ फेब्रुवारीपपर्यंत मान्यता देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

टॅग्स :thaneठाणेgram panchayatग्राम पंचायत